Headlines

पालिका अधिकारी बनून बार गर्लच्या घरात शिरले, पूर्ण घर शोधलं, शेवटी कचऱ्याच्या डब्ब्यात जे सापडलं… पोलिसांनाही बसला धक्का

पालिका अधिकारी बनून बार गर्लच्या घरात शिरले, पूर्ण घर शोधलं, शेवटी कचऱ्याच्या डब्ब्यात जे सापडलं… पोलिसांनाही बसला धक्का
पालिका अधिकारी बनून बार गर्लच्या घरात शिरले, पूर्ण घर शोधलं, शेवटी कचऱ्याच्या डब्ब्यात जे सापडलं… पोलिसांनाही बसला धक्का


एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमातील दृश्यालाही मागे टाकेल असा थरार टिटवाळ्यात पाहायला मिळाला आहे. वरून साधी बार गर्ल म्हणून वावरणाऱ्या एका महिलेच्या घरातून पोलिसांनी तब्बल ६ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. घाटकोपर अँटी नार्कोटिक्स सेल (ANC) आणि कल्याण ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉल हिला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, घराच्या कोपऱ्यात असलेल्या साध्या कचऱ्याच्या डब्याने या ६ कोटींच्या ड्रग्जचे गुपित उघड केले.

महापालिका अधिकारी बनून पोलिसांची एन्ट्री

घाटकोपर अँटी नार्कोटिक्स सेलला टिटवाळ्यातील पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये ड्रग्जचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. मात्र, आरोपी सतर्क होऊ नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या पथकाने अनोखी शक्कल लढवली. पोलीस कर्मचारी चक्क महानगरपालिकेचे अधिकारी बनले आणि सर्वेक्षणाच्या बहाण्याने इमारतीत शिरले. संपूर्ण इमारतीची रेकी केल्यानंतर त्यांनी अश्विनी पॉलचे घर गाठले आणि छापा टाकला.

कचऱ्याचा डबा ठरला गेम चेंजर

छापा पडल्यानंतर अश्विनीने आपण केवळ एक बार गर्ल असून आपला कोणत्याही गुन्ह्याशी संबंध नसल्याचा बनाव रचला. यानंतर पोलिसांनी संपूर्ण घर पिंजून काढले, पण सुरुवातीला त्यांच्या हाती काहीच लागले नाही. अखेर, पथकाची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या एका कचऱ्याच्या डब्याकडे गेली. त्यांनी तो डबा तपासला असता पोलिसांना धक्काच बसला. त्यात अत्यंत शिताफीने पिशव्यांमध्ये भरलेल्या ५ हजार एक्स्टसी (अमली) गोळ्या लपवून ठेवल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

अश्विनी की रुकसाना? बनावट ओळखीचा वापर

या तपासादरम्यान अश्विनीच्या दुहेरी ओळखीचा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी ती रुकसाना शेख या बनावट नावाने वावरत होती. धक्कादायक बाब म्हणजे, तिने या बनावट नावाने आधार कार्ड आणि इतर कागदपत्रेही तयार करून घेतली होती. या बनावट ओळखीचा वापर करून ती तिचे ड्रग्ज रॅकेट चालवत होती.

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अश्विनीचा लिव्ह-इन पार्टनर अमीर सय्यद असल्याचे समोर आले आहे. अमीरवर यापूर्वीही डीआरआयने (DRI) कारवाई केली होती. फेब्रुवारी महिन्यात तुरुंगात जाण्यापूर्वी अमीरने हा ड्रग्जचा साठा अश्विनीकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिला होता. स्वतःचा कोर्टाचा खर्च आणि वकिलाची फी भरण्यासाठी या ड्रग्जची विक्री करून पैसे उभे करण्याचे त्यांचे नियोजन होते. पोलिसांनी आता अमीर सय्यद यालाही बेड्या ठोकल्या आहेत.

मात्र या दोघांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज खरेदी करण्यासाठी १ कोटी रुपयांची ‘ॲडव्हान्स’ रक्कम कोठून आली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अश्विनीच्या नावावर असलेल्या मालमत्ता आणि तिच्या बँक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच तिची सर्व बँक खाती गोठवण्यात येणार आहेत. या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आहेत का, याचा तपास सध्या सुरु आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *