Headlines

जगाने ज्याचा विचारही केला नाही असे घडले, थेट गुप्तचर विभागाचा हैराण करणारा रिपोर्ट, इराणची..

जगाने ज्याचा विचारही केला नाही असे घडले, थेट गुप्तचर विभागाचा हैराण करणारा रिपोर्ट, इराणची..
जगाने ज्याचा विचारही केला नाही असे घडले, थेट गुप्तचर विभागाचा हैराण करणारा रिपोर्ट, इराणची..


इराण आणि अमेरिका युद्धात संपूर्ण जग भरडले जात आहे. जगात चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. होर्मुज खाडी ठप्प आहे. कोणताही मार्ग निघत नाहीये. गेल्या काही तासात होर्मुज खाडीत परिस्थिती अधिक चिघळली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दावा करण्यात आला की, इराणची वायुसेना पूर्णपणे उद्धवस्थ झाली. मात्र, अमेरिकेसाठी अत्यंत धक्कादायक अशी बातमी पुढे येत आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार, पेंटागन गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, इराणचे सैन्य अजूनही मजबूत स्थितीत आहे. अमेरिकेच्या मोठ्या हल्ल्यानंतरही त्यांची स्थिती अत्यंत चांगली आहे.

इराणसोबतच्या युद्धाच्या पहिल्या शांतता करार बैठकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, आम्ही इराणची नाैसेने पूर्णपणे उद्धवस्थ केली आहे. आम्ही त्यांची वायुसेनाही उद्धवस्थ केली. मात्र, नुकताच मिळालेल्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनंतर एकच खळबळ उडाली. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. पण अत्यंत मोठे अपयश पाकिस्तानला मिळाले.

मंगळवारी 21 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका युद्धाबाबत शांतता करार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आपण हजर राहणार नसल्याची भूमिका इराणने घेतली. अशा धमक्यांच्या स्थितीत बैठकीला हजर राहणार नसल्याची भूमिका इराणकडून घेण्यात आली. आता मोठ्या घडामोडी होर्मुज खाडीत घडताना दिसत आहेत. हेच नाही तर काही तासांपूर्वीच एका जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आला. होर्मुज खाडीत इराणकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे.

जर होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता प्रयत्न करत आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्वकाही उलटे सुरू आहे. होर्मुज खाडी अधिक घातक बनल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढल्याचे जग संकटात आहे. युद्धविराम करार बैठक कधी होणार यावर कोणत्याही देशांकडून बोलले जात नाही. पाकिस्तानच्या मध्यस्थीला अपयश मिळत आहे. रशियाने युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला. काही दिवस होऊनही युद्धबंदी करार घडून आणण्यात पाकिस्तानला यश मिळत नाहीये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *