Headlines

ये भाxxx दत्त्या, छिxxx तुझ्या घराच्या समोर…संजय गायकवाड यांच्या मुलाची गुंडगिरी? कारवर उभे राहून..कथित व्हिडीओने खळबळ!

ये भाxxx दत्त्या, छिxxx तुझ्या घराच्या समोर…संजय गायकवाड यांच्या मुलाची गुंडगिरी? कारवर उभे राहून..कथित व्हिडीओने खळबळ!
ये भाxxx दत्त्या, छिxxx तुझ्या घराच्या समोर…संजय गायकवाड यांच्या मुलाची गुंडगिरी? कारवर उभे राहून..कथित व्हिडीओने खळबळ!


बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी काँम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि धमकी दिली. याविषयीची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. त्यानंतर आता संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड चर्चेत आहे. कुणाल गायकवाडचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील त्याचे कृत्य पाहून सध्या जोरदार टीका होत आहे. हा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही.

शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाडचे कथित वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभूत उमेदवारांच्या दारी जात कुणाल गायकवाडने विरोधकाला अश्लील शिवीगाळ केल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. वडील संजय गायकवाड यांच्यानंतर कुणाल गायकवाडचे कारनामे व्हायरल होत असल्याचं चित्र दिसत आहे.

नेमकं व्हिडीओमध्ये काय?

बुलढाणा नगर परिषद निवडणूकसाठी नगरसेवक उमेदवार म्हणून कुणाल गायकवाड रिंगणात होता. प्रभाग क्रमांक 6 मधून त्याला 1437 मते मिळाली होती. राजकीय कट्टर विरोधक असलेल आणि काँग्रेसचे नेते दत्ता काकस यांच्या पत्नी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात होत्या. निवडणूक निकाल लागल्यावर मिरवणुकीदरम्यान कुणाल गायकवाडने दत्ता काकस यांच्या घरासमोर फाटके फोडले आणि डान्स केला. एव्हढेच नाही तर मिरवणुकीतील गाडीच्या बोनटवर चढून दत्त काक यांना शिवीगाळ केली. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. टीव्ही ९ मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

निवडणुकी वेळी दाखल झाला होता गुन्हा

सध्या सोशल मीडियावर कुणाल गायकवाड यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. निवडणुकीच्या वेळेस कुणाल गायकवाड (Kunal Gaikwad) आणि नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांच्यावर स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला (Bogus Voter) पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मदत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांवर कलम 132, 49, 351 – 2-3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *