
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातने अनेक व्यावसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवले होते. अलीकडेच या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली असून या प्रकरणात खरातने नाही, तर त्याच्या पत्नीने मोठा गेम केला आहे. थक्क करणारी बाब म्हणजे खरातच्या पत्नीने त्याच्या अटकेच्या दिवशीच लाखोंचा व्यवहार केल्याचे उघड झाले आहे.
भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावर अनेक गुन्हे दाखल असून पोलीस तिच्या शोधात आहेत. कल्पना खरातने अटकपूर्व जामीन अर्जसुद्धा दाखल केला होता. दरम्यान, एका मोठ्या बातमीने पोलिसांचे डोळे विस्फारले आहेत. भोंदू खरातच्या पत्नीने उरण येथील जमीन खरेदीत तब्बल ५८ लाखांची गुंतवणूक केली. हा सर्व व्यवहार अशोक खरातला अटक झाली त्या दिवशीचा आहे.