Headlines

ऑनलाइन फ्री ट्रायल घेणं पडलं महागात; अर्चना पुरण सिंहच्या मुलाच्या खात्यातून कापले गेले तब्बल इतके रुपये

ऑनलाइन फ्री ट्रायल घेणं पडलं महागात; अर्चना पुरण सिंहच्या मुलाच्या खात्यातून कापले गेले तब्बल इतके रुपये
ऑनलाइन फ्री ट्रायल घेणं पडलं महागात; अर्चना पुरण सिंहच्या मुलाच्या खात्यातून कापले गेले तब्बल इतके रुपये


अर्चना पुरण सिंह आणि तिचा मुलगाImage Credit source: Instagram

फ्री ट्रायल, सब्सक्रिप्शन अशा बऱ्याच ऑनलाइन मोहांना नेटकरी बळी पडतात. अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत.. अनेकजण ऑनलाइन फसवणुकीचे शिकार होताना दिसतात. असंच काहीसं सध्या अभिनेत्री अर्चना पुरण सिंहच्या मुलासोबत घडलंय. अर्चनाचा मुलगा आयुष्मान सेठीसोबत ऑनलाइन फसवणूक झाली आहे. एक सर्वसामान्य मोफ ट्रायल समजून त्याने ज्या सर्व्हिसला सुरू केलं होतं, त्याद्वारे त्याच्या क्रेडिट कार्डमधून एका झटक्यात हजारोंची रक्कम कापली गेली. या घटनेनं अर्चना आणि तिच्या मुलाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. अर्चना आणि तिची मुलं युट्यूबवर सक्रिय असून ते चाहत्यांसोबत विविध व्लॉग शेअर करत असतात. नुकताच तिचा मोठा मुलगा आर्यमान सेठी याने त्याच्या अकाऊंटवर व्लॉग अपलोड केला.

या व्लॉगमध्ये सुरुवातीला तो कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे, त्यानंतर मात्र त्याचा भाऊ आयुष्मान अचानक प्रचंड घाबरलेला दिसतोय. जेव्हा अर्चनाने त्याला याविषयी विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की त्याच्या क्रेडिट कार्डमधून अचानक 87 हजार रुपये डेबिट झाले आहेत. सर्वांत आधी त्याने कस्टमर केअरशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याने सांगितलं की त्याने सात दिवसांच्या फ्री ट्रायलच्या नावाखाली एका सर्व्हिसला एक्सेप्ट केलं होतं. आयुष्मानसोबत झालेल्या फसवणुकीचा खुलासा त्याचा मोठा भाऊ आर्यमान आपल्या व्लॉगमध्ये करतो.

आयुष्मान सांगतो की, सर्व्हिस अॅक्टिव्ह केल्याच्या काही वेळानंतर संपूर्ण वर्षभराची फी म्हणून एक मोठी रक्कम बँक खात्यातून डेबिट झाली. अचानक ही रक्कम खात्यातून वजा झाल्याने आयुष्मान चिंतेत आला. या फसवणुकीबद्दल ऐकून अर्चना आणि तिच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला. व्हिडीओमध्ये आयुष्मान सांगतो की आधी शून्य डॉलरचा ट्रायल ट्रान्सॅक्शन दाखवण्यात आला होता. ते मंजूर केल्यानंतर त्याच्या कोणत्याच परवानगीशिवाय क्रेडिट कार्डमधूम 87 हजार रुपये कापले गेले.

हे समजताच अर्चनाने त्याला लगेचच बँक आणि कार्ड कंपनीशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला सर्वजण घाबरलेले होते, परंतु नंतर कुटुंबीयांनी तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आयुष्मानसोबत अशा प्रकारची फसवणूक झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याच्याआधीही त्याच्या अकाऊंटमधून 80 हजार रुपये कापले गेले होते. त्यामुळे आयुष्मान हा फसवणुकीचा नियमित ग्राहक बनल्याची मस्करी अर्चना आणि तिच्या कुटुंबीयांनी केली.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *