Headlines

LSG vs KKR : प्रेम, दु:ख, अभिमान, भावनांचा संगम, केकेआरच्या विजयापेक्षा रिंकू सिंहच्या भावी पत्नीच्या इमोशन्सची जास्त चर्चा VIDEO

LSG vs KKR : प्रेम, दु:ख, अभिमान, भावनांचा संगम, केकेआरच्या विजयापेक्षा रिंकू सिंहच्या भावी पत्नीच्या इमोशन्सची जास्त चर्चा VIDEO
LSG vs KKR : प्रेम, दु:ख, अभिमान, भावनांचा संगम, केकेआरच्या विजयापेक्षा रिंकू सिंहच्या भावी पत्नीच्या इमोशन्सची जास्त चर्चा VIDEO


आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने काल रोमांचक सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये कोलकाताना हा विजय मिळवला. त्यामुळे मैदानावर खास सेलिब्रेशन झालं. तिथे प्रेक्षक स्टँडमध्ये काही भावनिक क्षण पहायला मिळाले. रिंकू सिंहची भावी पत्नी प्रिया सरोज भावनिक झालेली. तिची इमोशनल Reaction या सामन्यातील सर्वात मोठा क्षण बनला. रविवारी लखनऊच्या इकाना स्टेडियमवर हा सामना झाला. रिंकू सिंहचा उत्साह वाढवण्यासाठी प्रिया सरोज स्टेडियमवर उपस्थित होती. KKR ने शेअर केलेल्या व्हिडिओत प्रिया सरोज स्टँडमध्ये केकेआरचा झेंडा फडकवताना दिसली. तिने रिंकूची ही मॅच विनिंग इनिंग आपल्या दिवंगत सासऱ्यांना समर्पित केली.

स्प्लिट-स्क्रीन व्हिडिओमध्ये प्रियाची भावनिक प्रतिक्रिया होती. दुसरीकडे रिंकूचा विजयी जल्लोष दिसत होता. त्यामुळे भावी पती-पत्नीसाठी हा क्षण खास होता. “मी खूप खुश आहे, आज जे ते खेळले, ते आमच्या सासऱ्यासाठी आहे. आज आम्ही त्यांना भरपूर मिस करतोय. हे त्यांच्यासाठीच आहे” असं प्रिया सरोज व्हिडिओमध्ये बोलताना दिसते.

जास्त चर्चा प्रिया सरोजच्या व्हिडिओची

केकेआरने कालच्या सामन्यात पहिली फलंदाजी केली. 7 बाद 93 वरुन 20 ओव्हर्समध्ये त्यांनी 7 बाद 155 धावा केल्या. रिंकू सिंह 51 चेंडूत नाबाद 83 धावा फटकावल्या. यात लास्ट ओव्हरमध्ये मारलेल्या चार सिक्स आहेत. कॅमरुन ग्रीनने कोलकाता कडून 34 धावा केल्या. LSG साठी मोहसीन खानने भेदक गोलंदाजी केली. त्याने 23 धावात 5 विकेट काढल्या. सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनने कमाल गोलंदाजी केली. त्याने फक्त 1 रन्स देऊन 2 विकेट काढल्या.

रिंकू सिंहने प्रिन्स यादवच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारुन टीमला विजय मिळवून दिला. या विजयापेक्षा जास्त चर्चा प्रिया सरोजच्या व्हिडिओची आहे. ज्यात तिचं प्रेम, दु:ख आणि अभिमान सर्व दिसतं.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *