Headlines

महाराष्ट्रातल्या दुर्गम गावातली कथा, प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ, थरार.. दुसऱ्या आठवड्यातही दमदार प्रतिसाद

महाराष्ट्रातल्या दुर्गम गावातली कथा, प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ, थरार.. दुसऱ्या आठवड्यातही दमदार प्रतिसाद
महाराष्ट्रातल्या दुर्गम गावातली कथा, प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ, थरार.. दुसऱ्या आठवड्यातही दमदार प्रतिसाद


गूढ, थरार आणि सत्याच्या शोधाचा प्रभावी संगम साधणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची मनं जिंकली. आता दुसऱ्या आठवड्यातही त्याच दमदार प्रतिसादासह ‘सालबर्डी’ची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. रहस्यमय कथानक, अनपेक्षित वळणं आणि उत्कंठावर्धक सादरीकरण ही ‘सालबर्डी’ची प्रमुख वैशिष्ट्यं ठरत आहेत. प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ आणि त्याचा उलगडा करण्याची सततची धडपड प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यामुळेच राज्यभरात चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

दुसऱ्या आठवड्यात अनेक चित्रपटगृहांत ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकत असून, सोशल मीडियावरही ‘सालबर्डी’बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या पदार्पणाबद्दल निर्मात्यांनी आनंद व्यक्त करत सांगितलं, “प्रेक्षकांनी ‘सालबर्डी’ला दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसऱ्या आठवड्यातही मिळत असलेलं प्रेम आम्हाला उत्तम काम करण्याची प्रेरणा देत आहे.” नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेल्या ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली आहे. दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी या चित्रपटाचं प्रभावी दिग्दर्शन केलं आहे.

चित्रपटात अभिनेत्री पूजा सावंत सोबत शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर आणि कोमल चौधरी यांचा दमदार अभिनय पहायला मिळतो आहे. ‘सालबर्डी’ चित्रपटात पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. पी. आय. मनोरमा प्रधान असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेसाठी तिने विशेष मेहनत घेतली असून, पोलिसांची देहबोली,अधिकारपूर्ण संवादशैली आणि शिस्तबद्ध वर्तन यांचा सखोल अभ्यास करत ही भूमिका पूजाने साकारली आहे. वास्तवदर्शीपणा जपण्यासाठी तिने प्रत्यक्ष पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाचं बारकाईने निरीक्षण केलं.

या भूमिकेबद्दल बोलताना पूजा सांगते, “वर्दी अंगावर चढताच एक वेगळाच रुबाब आपोआप येतो. तो वेगळा दाखवावा लागत नाही. वर्दीतच एक ताकद असते. माझी ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल.” चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार अ‍ॅक्शन सीन्स हे ‘सालबर्डी’ चे खास आकर्षण आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *