Headlines

नवलंच! रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र, नेमकं काय घडतंय?

म्हसळा नगरपंचायतीतील राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. जानेवारी 2026 मध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून 7 नगरसेवकांना अपात्र ठरवले होते. हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत (शिंदे गट) गेले होते.

अपात्र ठरलेल्यांमध्ये नगराध्यक्ष फरहिन अजीज बशरत, कमल रवींद्र जाधव, मेहजबिन नदीन दळवी, असहल असलम कादिरी, सुमैया कॉसम आमदानी, कादीर म्हसलाई आणि शाहीद जंजिरकर यांचा समावेश होता. या निर्णयामुळे शिंदे गटाला स्थानिक स्तरावर मोठा धक्का बसला होता.

मात्र, या सर्व नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना दिलासा मिळाल्याची माहिती समोर येत आहे. न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याने ते पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे म्हसळा नगरपंचायतीतील सत्तासमीकरण पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *