Headlines

May Bank Holiday : मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी!

May Bank Holiday : मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी!
May Bank Holiday : मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी!


May Month Bank Holiday List : आता एप्रिल महिना संपत आला आहे. लवकरच मे महिना सुरू होईल. या महिन्यात काय-काय कामं करावयाची आहेत, याची सर्वजण यादी करत असतील. महत्त्वाच्या कामांना प्राधान्यक्रम देण्याचा सर्वांच प्रयत्न असेल. अनेकजण बँकेची कामे करण्यासाठी नियोजन आखत असतील. परंतु हे नियोजन आखण्याआधी तुम्ही देशातल्या बँकांना सुट्टी नेमकी कधी-कधी आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण बँकांना सुट्ट्या कधी आहेत, हे जर माहिती नसेल तर ऐनवेळी तुमची पंचाईत होऊ शकते.

मे महिन्यात नेमक्या किती सुट्ट्या

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) कॅलेंडरनुसार मे 2026 मध्ये बँकांना एकूण 13 दिवस सुट्ट्या असतील. आठवड्याची सुट्टी तसेच अन्य सण, उत्सव, महापुरुषांची जयंती यामुळे मे महिन्यात एकूण 13 सुट्ट्या असतील. त्यामुळेच या 13 दिवसांच्या सुट्ट्या लक्षात घेऊनच बँकेशी संंबंधित कामांचे नियोजन करावे.

मे महिन्यात बँका नेमक्या कधी बंद असतील?

मे महिन्यात बँका 1, 3, 9, 10, 16, 17, 23, 24, 26, 27, 28 तेसच 31 मे रोजी बंद असतील. 1 मे रोजी गुजरात, ओडिशा, सिक्कीम, राजस्थान, नागालँड, मेघालय ही राज्ये वगळता देसात सर्वत्र सुट्टी असेल. 9 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये बँकांना सुट्टी असेल. 16 मे रोजी सिक्कीम, 26 मे रोजी त्रिपुरा येथे बँका बंद असतील. 27 मे रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, तमिलनाडू, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, गोवा आणि बिहार वगळता इतर संपूर्ण देशात बँक बंद असेल. 28 मे रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, तमिलनाडू, जम्मू-कश्मीर, राजस्थान, गोवा, बिहार येथे बँक बंद असेल. याशिवाय 3, 10, 17, 24 आणि 31 मे रोजी रविार आहे. 9 आणि 23 मे रोजी दुसरा आणि चौथा रविवार असल्याने या दिवशीही बँका बंद असतील. दरम्यान, या दिवशी बँका बंद असल्या तरीही नेट बँकिग, मोबाईल बँकिंगचे सर्व व्यवहार सुरुच असतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *