Headlines

Baramati By Elections Exit Polls : बारामती पोटनिवडणुकीत चमत्कार? सुनेत्रा पवार यांचा विजय होणार का? थक्क करणारा एक्झिट पोल समोर!

Baramati By Elections Exit Polls : बारामती पोटनिवडणुकीत चमत्कार? सुनेत्रा पवार यांचा विजय होणार का? थक्क करणारा एक्झिट पोल समोर!
Baramati By Elections Exit Polls : बारामती पोटनिवडणुकीत चमत्कार? सुनेत्रा पवार यांचा विजय होणार का? थक्क करणारा एक्झिट पोल समोर!


Baramati By Election Exit Polls : चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. आता या सर्वच राज्यांतील मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे. या राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमासोबतच बारामती आणि राहुरी या महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर आले आहेत.

सुनेत्रा पवार यांना किती मतं मिळणार?

एक्झिट पोलच्या अंदाजनुसार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठ्या प्रमाणात मतं पडणार आहेत. रिंगसाईड रिसर्च या संस्थेच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बारामतीत सुनेत्रा पवार यांना 92 ते 97 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यांना एक ते दोन लाख मतं मिळू शकतात. तर दुसरीकडे राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राहुल कर्डिले यांनादेखील 78 ते 83 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यांना 95 हजार ते 1 लाख मतं मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बारामतीच्या मतदारांनी सुनेत्रा पवार यांना भरभरून मतदान केल्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांना तब्बल 97 टक्के मतं मिळणार असतील तर हा एका प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित, किती मतं मिळणार?

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधाऱ्याचे प्रयत्न चालू होते. सुरुवातीला काँग्रेसने या मतदारसंघासाठी आपला उमेदवार दिला होता. परंतु नंतर सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी सुनेत्रा पवार यांना मतदान करा, असे आवाहन केल्यानंतर त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. असे असताना आता एक्झिट पोलचे आकडेदेखील त्यांना विक्रमी मतदान होणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांना नेमकी मतं किती मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टीप- एक्झिट पोलचे आकडे खरेच असतात असे नाही. प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच कोणाची सत्ता येईल, हे स्पष्ट होईल. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून कोणचा विजय होणार याचा फक्त अंदाज बांधता येतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *