Headlines

West Bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये वारं फिरलं, ममता बॅनर्जींना मोठा धक्का, भाजपची जोरदार मुसंडी

West Bengal Exit Poll :  पश्चिम बंगालमध्ये वारं फिरलं, ममता बॅनर्जींना मोठा धक्का, भाजपची जोरदार मुसंडी
West Bengal Exit Poll :  पश्चिम बंगालमध्ये वारं फिरलं, ममता बॅनर्जींना मोठा धक्का, भाजपची जोरदार मुसंडी


आज पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचं मतदार पार पडलं आहे. येत्या 4 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वीच आता विविध संस्थांचे एक्झिट पोल हाती आले आहेत.  या एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार  यावेळी पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात सलग चौथ्यांदा सत्तेत येण्याच्या मिशनला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलण्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.  पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागा आहेत, त्यापैकी तृणमूल काँग्रेसला  125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजपला 146 ते 161 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  मॅट्रिझच्या एक्झिट पोलची ही आकडेवारी आहे.

तर चाणक्यच्या पोलमध्ये देखील पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येऊ शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चाणक्यच्या पोलनुसार  पश्चिम बंगालमध्ये भाजपला 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर  तृणमूल काँग्रेसला 130 – 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. पोल डायरीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला अवघ्या 99 ते 127 जागा मिळू शकतात, तर भाजपला 142 ते 171 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  तर पोल ऑफ एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला 143 आणि तृणमूल काँग्रेसला 144 जागा मिळण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का 

एक्झिट पोलची आकडेवारी खरी ठरल्यास पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांची सलग तीन टर्म पश्चिम बंगालमध्ये सत्ता आहे. मात्र यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येणार असल्याचा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोलने वर्तवला आहे, त्यामुळे जर समजा एक्झिट पोलची आकडेवारी खरी ठरली तर हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.

भाजपची तीन ठिकाणी सत्ता येण्याचा अंदाज  

दरम्यान भाजपची तीन ठिकाणी सत्ता येण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. त्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी यांचा समावेश आहे. तर केरळमध्ये डाव्या पक्षांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तिथे काँग्रेस सत्तेमध्ये येऊ शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *