Headlines

डॉनच्या घरात धुणीभांडी करणारी ‘ती’ अभिनेत्री कोण? बापाच्या राज्यात अनुभवले सुख, आज जगतेय असं आयुष्य!

डॉनच्या घरात धुणीभांडी करणारी ‘ती’ अभिनेत्री कोण? बापाच्या राज्यात अनुभवले सुख, आज जगतेय असं आयुष्य!
डॉनच्या घरात धुणीभांडी करणारी ‘ती’ अभिनेत्री कोण? बापाच्या राज्यात अनुभवले सुख, आज जगतेय असं आयुष्य!


Actress Love with Don: अंडरवर्ल्ड विश्वातील अनेक गुंडांमुळे बॉलिवूड अभिनेत्रींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या अनेक अभिनेत्री एका रात्रीत गायब झाल्या. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. एवढंच नाही तर, एक काळ असा देखील होता जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड डॉनची दहशत होती. याच दहशतीमुळे अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडचा निरोप घेतला, तर काही गुंडांनी अभिनेत्रींना खोटं सांगून प्रेमाच्या जाळ्यात फसवलं… असंच काही एका अभिनेत्रीसोबत जाझं. प्रेम करत असल्याचं सांगत अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम अभिनेत्री मोनिका बेदी हिला परदेशात घेऊन गेला आणि त्याठिकाणी अभिनेत्रीवर धुणीभांडी करण्याची वेळ आली. याबद्दल खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केलेला.

एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री मोनिका बेदी हिचा बॉलिवूडमध्ये बोलबाला होता… असंख्य चाहते अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होते. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम देखील होता… पहिल्या भेटीनंतर मोनिका आणि अबू सलेम एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमाखातर अभिनेत्रीने बॉलिवूडचा निरोप घेतला आणि मोनिका सलेम याच्यासोबत राहू लागली. पण तेव्हापासूनच अभिनेत्रीच्या आयुष्यातील वाईट दिवस सुरु झाले. अंडरवर्ल्ड डॉनवर प्रेम केल्यामुळे अभिनेत्रीला एक वर्ष तुरुंगवास देखील भोगावा लागला…

एका मुलाखतीत मोनिका म्हणालेली, ‘प्रेमात काय चांगलं आणि काय वाईट याबद्दल आपल्याला काहीही कळत नाही… तुमच्या डोळ्यावर त्या व्यक्तीने प्रेमाची पट्टी बांधलेली असते. त्या व्यक्तीची खरी बाजू कधी माझ्या समोर आलीच नाही… पोर्तुगाल येथे जेव्हा मी त्याच्या विरोधातील चार्जशीट वाचली तेव्हा मला मोठा धक्का बसला. सलेम याच्याकडे अफाट पैसा आहे, म्हणून मी त्याच्याकडे आहे… असं सर्वांना वाटत होतं. पण सत्य मात्र काही वेगळंच होतं…’

‘सलेम याच्यासोबत असताना मी त्याच्यासाठी जेवण बनवलं आहे, धुणीभांडी केली आहे… मी चांगलं आयुष्य पाहिलं असेल तर, फक्त माझ्या आई – वडिलांच्या घरी आणि जेव्हा मी स्वतः पैसे कमावू लागले… मला कळलंच नाही, मी त्याच्या जाळ्यात कशी अडकले…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

रिपोर्टनुसार, मोनिकाने सांगितलं की, तिला माहित नव्हतं की तो अबू सालेम आहे. त्याने मला त्याचं नाव अरसलान अली सांगितलं आणि काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मला सत्य कळलं. जर मला आधी माहित असतं तर मी स्वतःहून निघून गेली असती… असं देखील मोनिका म्हणाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *