Headlines

39 वर्षीय अभिनेत्रीने 200 कोटींची पोटगी नाकारली, घटस्फोटानंतर 11 मोठ्या सेलिब्रिटीसोबत थाटला संसार, आज जगतेय रॉयल आयुष्य

39 वर्षीय अभिनेत्रीने 200 कोटींची पोटगी नाकारली, घटस्फोटानंतर 11 मोठ्या सेलिब्रिटीसोबत थाटला संसार,  आज जगतेय रॉयल आयुष्य
39 वर्षीय अभिनेत्रीने 200 कोटींची पोटगी नाकारली, घटस्फोटानंतर 11 मोठ्या सेलिब्रिटीसोबत थाटला संसार,  आज जगतेय रॉयल आयुष्य


झगमगत्या विश्वात सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा अधिक खाजगी आयुष्याची अधिक चर्चा रंगलेली असते. रिलेशनशिप, ब्रेकअप, लग्न आणि घटस्फोट तर आता इंडस्ट्रीमध्ये सामान्य गोष्ट झाली आहे. सेलिब्रिटींच्या घटस्फोटानंतर अधिक चर्चा रंगते ती म्हणजे पोटगीची. आतापर्यंत झगमगत्या विश्वात अनेक महागडे घटस्फोट झाले आहे. घटस्फोटानंतर सेलिब्रिटींना कोट्यवधी रुपये पोटगी म्हणून द्यावे लागले आहेत. पण एका अभिनेत्रीने तर तब्बल 200 कोटी रुपयांची पोटगी नाकारली. लग्नाच्या चार वर्षांनंतर अभिनेत्रीचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्रीने स्वतःपेक्षा 11 वर्ष मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न केलं आणि दुसरा संसार थाटला.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) आहे. रिपोर्टनुसार 2021 मध्ये मोठ्या थाटात अभिनेता नागा चैतन्य आणि सामंथा यांनी लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काही टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 4 वर्षांनंतर सामंथा आणि नागा चौतन्य यांनी घटस्फोटाचा निर्णय घतला..

पण घटस्फोटाच्या वेळी नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबियांकडून सामंथा हिला 200 कोटी रुपये पोटगी मिळणार होती, पण अभिनेत्री पोटगी म्हणून एकही रुपया घेतला नाही. अभिनेत्रीने स्वतःचा आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ही आर्थिक तडजोड सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कारकिर्दीच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्याचं ध्येय ठेवलं.

एवढंच नाही तर, ‘कॉफी विथ करण 7’ शोमध्ये देखील सामंथा हिने पोटगी घेतली नसल्याची कबुली दिली… नागा चैतन्य आणि सामंथा यांनी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. अनेक मुलखतींमध्ये अभिनेत्रीने घटस्फोटावर वक्तव्य केलं.

घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर नागा चैतन्या याने अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबच लग्न केलं. 4 डिसेंबर 2004 मध्ये दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.

नागा याने दुसरा संसार थाटल्यानंतर सामंथा हिने देखील स्वतःपेक्षा 11 वर्ष मोठ्या निर्मात्यासोबत लग्न केलं. 1 डिसेंबर 2025 मध्ये अभिनेत्रीने निर्माता राज निदिमोरु (Raj Nidimoru) याच्यासोबत एका मंदिरात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *