
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 44 व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर होम टीम चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान आहे. मुंबई आणि चेन्नई यांचा हा या हंगामातील एकूण नववा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. चेन्नई आणि मुंबईची 19 व्या हंगामात आमनसामने येण्याची दुसरी वेळ आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. चेन्नई आणि मुंबईने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी दिलीय आणि कुणाला बाहेर केलंय हे जाणून घेऊयात.
चेन्नईकडून मॅचविनर गोलंदाजाला बाहेरचा रस्ता
चेन्नईने मुंबई इंडियन्सनवर 23 एप्रिलला 103 धावांनी विजय मिळवला होता. अकील हौसेन याने 208 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला 104 वर गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. अकीलने मुंबईला 4 झटके दिले होते. मात्र याच अकीलला आता प्लेइंग ईलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे. तसेच गुरजनप्रीत सिंह यालाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या दोघांच्या जागी रामकृष्ण घोष आणि अकील होसेन यांना संधी देण्यात आली आहे. तर मुंबईने अश्वनी कुमार याला बाहेर केलं आहे. तर क्रिश भगत याचं कमबॅक झालं आहे. तर रघु शर्मा याचं आयपीएल पदार्पण झालं आहे.
पॉइंट्स टेबलमधील स्थिती
दरम्यान चेन्नई आणि मुंबईची या मोसमात काही प्रमाणात सारखीच स्थिती आहे. चेन्नईने 8 पैकी 5 सामने गमावले आहेत. तसेच चेन्नईला 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. चेन्नई पॉइंटस टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. तर मुंबईला 8 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर मुंबईला 6 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. चेन्नई आणि मुंबई दोन्ही संघांचे प्रमुख खेळाडू हे दुखापतीमुळे टीममधून बाहेर आहेत. महेंद्रसिंह धोनी याला दुखापतीमुळे या मोसमात आतापर्यंत एकही सामन्यात खेळता आलेलं नाही. तर रोहित आरसीबी विरुद्ध झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर आहे.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेव्हीस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज आणि मुकेश चौधरी.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, रॉबिन मिंझ, ट्रेंट बोल्ट, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह आणि अल्लाह गझनफर.