Headlines

IND vs PAK: भारत-पाकिस्तान भिडणार, टीम इंडियाची घोषणा, सामना कधी-कुठे?

IND vs PAK: भारत-पाकिस्तान भिडणार, टीम इंडियाची घोषणा, सामना कधी-कुठे?
IND vs PAK: भारत-पाकिस्तान भिडणार, टीम इंडियाची घोषणा, सामना कधी-कुठे?


क्रिकेट चाहत्यांना कायमच टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रतिक्षा असते. महिला असो वा पुरुष चाहत्यांचं या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील सामन्याकडे लक्ष असतं. मेन्स आणि वुमन्स क्रिकेट टीम इंडियाने आतापर्यंत पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला आहे. भारताचे दोन्ही संघ पाकिस्तानवर वरचढ राहिले आहेत. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 15 फेब्रुवारीला पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर आता वुमन्स टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

आयसीसी टी 20I वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. या 12 संघांना 6-6 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 5 सामने खेळणार आहे. टीम इंडियाची या स्पर्धेसाठी 2 मे रोजी घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. स्मृती मंधाना हीच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना कधी?

वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. हा सामना 12 जूनला होणार आहे. त्यानंतर स्पर्धेत सलग सामने होणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 जूनला महामुकाबल्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाचे सामने

टीम इंडिया पाकिस्ताननंतर आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 17 जून रोजी होणार आहे. मुंबईसमोर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. हा सामना 21 जून रोजी होणार आहे.

त्यानंतर टीम इंडियासमोर बांगलादेश विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना 21 जूनला होणार आहे. तर टीम इंडियाची महिला ब्रिगेड या मोहिमेतील आपला शेवटचा साखळी सामना हा 28 जूनला खेळणार आहे. महिला ब्रिगेडसमोर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.

टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, रेणुका ठाकुर, क्रांति गौड, श्री चरणी, श्रेयंका पाटील, भारती फुलमाळी, यस्तिका भाटिया, नंदनी शर्मा आणि राधा यादव.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *