Headlines

Pune Nasrapur Case | नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज…

Pune Nasrapur Case | नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज…
Pune Nasrapur Case | नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज…


पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारले, इतकेच नाही तर नंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवले. ही घटना इतकी किळसवाणी होती की अंगावर काटा येईल. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, प्रकरणा संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील सर्व फुटेज व तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील सर्व माहिती पोलीस जलद गतीने गोळा करत आहेत. या प्रकरणात SIT देखील स्थापन झाली असून विविध साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. संबंधित प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *