
आपल्या दैनंदिन जीवनात काही सवयी अंगवळणी पडलेल्या असतात. मात्र, या सवयांनी आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो. उदा. रात्री उशीरापर्यंत जागणे, चुकीचा आहारण घेणे, कमी पाणी पिणे, किंवा एकाच जागी अनेक तास बसून राहणे आदी. मात्र, कालांतराने या सवयी गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात. यातील मोठी गोष्ठ ही की याची जाणीव आपल्या शरीराकडून होत असतो. हेल्थ एक्सपर्ट्स आणि संशोधन हे सांगते की आपली लाईफस्टाईलच आपल्या आरोग्याचा खरा पाया असते. त्यामुळे काही किरकोळ वाटणाऱ्या सवयी आपली रोग प्रतिकारक शक्ती कमजोर करु शकतात. त्यामुळे आपल्यास हृदयाचा आजार, लठ्ठपणा आणि डायबिटीज सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
आता आपण जाणून घेऊयात की कोणत्या सवयी आपण किरकोळ समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. हॉवर्ड येथून शिकलेले डॉ.सौरभ सेठी यांनी अलिकडेच आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करुन त्या सहा घातक सवयींची माहिती दिली आहे. ज्या सवयींना आजपासूनच आपण बदलले पाहिजे. चला तर या सवयी कोणत्या आणि त्यांच्या शरीरावर होणार परिणाम पाहूयात…
दीर्घकाळ लघवी रोखून धरणे
काही लोक लघवीला रोखून धरतात. आणि खूप जोराने प्रेशर आल्यानंतरच टॉयलेटला जातात. मात्र, ही सवय अतिशय नुकसानकारक आहे. वास्तविक, मुत्राशय लघवीने भरुन राहिल्याने बॅक्टेरिया वेगाने पसरतात. ज्यामुळे युरिन इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
तोंड उघडून झोपणे
ही सवय जरी सामान्य वाटत असली तर डॉ.सौरभ सेठी सांगतात की तोंड उघडे करुन झोपल्याने झोपेची क्वालिटी खराब होते. तोंड जास्त सुखते आणि घोरणे सुरु होते. सतत घोरणे ही साधारण समस्या नाही.यास हाय ब्लडप्रेशरशी देखील जोडले जाते. याशिवाय स्लीप एपनिया सारखी गंभीर समस्या पाच पैकी एक प्रोढाला सतावत आहे.
चुकीच्या पोश्चरमध्ये दीर्घकाळ बसणे
दीर्घकाळ शरीरास चुकीच्या पोश्चर मध्ये ठेवून बसल्याने पाठ आणि मानेवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे पाठदुखी आणि स्नायू आखडण्या सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच दीर्घकाळ असे बसल्याने सांध्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते.
टॉयलेटमध्ये उशीरापर्यंत बसणे
आजकाल टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे लोक नेहमीपेक्षा जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसतात. परंतू टॉयलेटमध्ये बराच काळ बसल्याने नसांवर एक्स्ट्रा प्रेशर येते. यामुळे मुळव्याधाचा देखील त्रास सुरु होऊ शकतो.
वारंवार चेहऱ्याला हात लावणे
जर तुम्हाला चेहऱ्याला सारखा हात लावण्याची सवय असेल तर ती आज बदला. कारण, संपूर्ण दिवसभर आपण अनेक वस्तूंना स्पर्श करत असतो. त्यामुळे हातांना बॅक्टेरिया लागलेले असतात. अशा हातांनी चेहऱ्याला स्पर्श केल्याने स्कीन इंफेक्शन, पुठकळ्या किंवा इरिटेशन होऊ शकते.
पटापटा जेवणे
खूप वेगाने किंवा घाई-घाईत जेवणे देखील आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. त्यामुळे तुम्ही ओव्हर ईटींग करु शकता.ज्यामुळे ब्लोटिंगची समस्या होऊ शकते. कारण आपण घाईघाईने खाता तेव्हा मेंदूला हे विचार करण्यास अवधी मिळत नाही की तुमचे पोट भरले आहे. त्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाता. त्यामुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात.