Headlines

Supriya Sule : सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी…, सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य

Supriya Sule : सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी…, सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य
Supriya Sule : सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी…, सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य


राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे, 2029 च्या निवडणुकीत सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी बारामतीकरांची इच्छा आहे, असं जय पवार यांनी म्हटलं होतं. जय पवार यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. जय पवार यांच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. दरम्यावर यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे. तसेच त्यांनी यावेळी सरकारवर देखील विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

2029 मध्ये सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी बारामतीकरांची इच्छा आहे, असं विधान जय पवार यांनी केलं होतं. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,  सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मी घालेन. 2029 निवडणुकीमध्ये कोण कुठल्या पक्षात असेल? हे 2029 मध्येच कळेल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज्यात सध्या ऑपरेशन तुतारीची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू आहे. हे मी निवडून आल्यापासून ऐकते आहे. गेली अनेक वर्ष हे चाललेल आहे. आम्ही स्वाभिमानी मराठी माणूस आहोत. आमची कोणती भानगड नाही. आपली इडापिडा काही नाही. तुमच्या सगळ्यांची सेवा करतो आहे. लोकांनी आम्हाला संधी दिली आहे या संधीचा मान ठेवूनच चांगला बदल घडवू . सत्तेत असलो अगर नसलो तरी आमची कामे होतात. तोडून फोडून या गोष्टी होतील पण त्यात काही गंमत राहिलेली नाही, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. कांद्याची परिस्थिती गंभीर आहे अवकाळी चा फटका शेतकऱ्यांना बसतोय.  शेतीमालाला भाव मिळत नाहीये. युद्धजन्य परिस्थितीमुळे युरिया मिळत नाहीये. पहेलगाम हल्ला झाला तेव्हा शरद पवार यांनी पहिल्यांदा म्हटलं होतं हा देशावरील हल्ला आहे. आम्ही राजकारण बाजूला ठेवून सरकारसोबत आहोत. त्यावेळी आम्ही पक्ष बघितला नाही पहिला देश त्यानंतर राज्य त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर कुटुंब अशी भावना आम्ही ठेवली आहे. हे सरकार त्यांच्याच मंत्र्यांना धक्काबुक्की करणार, नोटीसी लावणार, प्रशासक लावणार असं असताना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सरकारला वेळ आहे का? असा सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *