Headlines

फक्त मिठी मारून ही महिला कमावते 1 कोटी रुपये, 3 तासासाठी बनते पार्टनर, अनेकदा होतात चुका

फक्त मिठी मारून ही महिला कमावते 1 कोटी रुपये, 3 तासासाठी बनते पार्टनर,  अनेकदा होतात चुका
फक्त मिठी मारून ही महिला कमावते 1 कोटी रुपये, 3 तासासाठी बनते पार्टनर,  अनेकदा होतात चुका


Viral News : अमेरिकेत सध्या एक वेगळाच व्यवसाय चर्चेचा विषय ठरत आहे. लोकांना भावनिक आधार देण्यासाठी मिठी मारणे, जवळ बसून संवाद साधणे आणि मानसिक आधार देणे या कामातून एका महिलेने कोट्यवधींची कमाई केली आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणारी 51 वर्षीय एला लव सध्या ‘प्रोफेशनल कडलर’ म्हणून काम करत असून केवळ दिवसाला तीन तास काम करून ती वर्षाला जवळपास 1 कोटी रुपयांची कमाई करत असल्याची माहिती समोर आली आहे.

एला लव यापूर्वी शिक्षिका म्हणून काम करत होती. तब्बल 13 वर्षे तिने अध्यापन क्षेत्रात काम केले. मात्र सततचा ताण, मानसिक दबाव आणि कामाचा वाढता तणाव यामुळे ती त्रस्त झाली. याच काळात तिला एका लेखातून ‘प्रोफेशनल कडलिंग’ या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. यानंतर तिने सुमारे 250 पाउंड खर्च करून या क्षेत्राचे प्रशिक्षण घेतले आणि सुरुवातीला पार्टटाइम काम सुरू केले. गेल्या आठ वर्षांपासून ती पूर्णवेळ ‘प्रोफेशनल कडलर’ म्हणून कार्यरत आहेत.

नेमकं काय असतं प्रोफेशनल कडलिंग?

प्रोफेशनल कडलिंगमध्ये क्लायंटला मिठी मारणे, भावनिक आधार देणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यांना मानसिकदृष्ट्या रिलॅक्स वाटेल असे वातावरण तयार करणे याचा समावेश असतो. अनेक लोक एकटेपणा, नैराश्य, तणाव किंवा भावनिक समस्यांमुळे या सेवांचा वापर करतात.

एला सांगते की, अनेक क्लायंट त्यांच्या आयुष्यातील अशा गोष्टी तिच्यासोबत शेअर करतात ज्या त्यांनी आजवर कुणालाही सांगितलेल्या नसतात. काही लोक फक्त जवळ बसून बोलू इच्छितात, काहींना मिठीची गरज असते तर काहींना मानसिक आधार हवा असतो.

तासाला हजारो रुपये फी

एला एका तासासाठी 13 हजार रुपये शुल्क आकारते. दिवसाला फक्त तीन तास काम करूनही ती महिन्याला मोठी कमाई करते. तिच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा जवळपास 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते.

कधी-कधी ती एका सेशनमध्ये 9 तासांपर्यंतही काम करते. मात्र बहुतांश वेळा ती कमी तास काम करूनच चांगले उत्पन्न मिळवते.

क्लायंट्सकडून ‘सीमा ओलांडण्याचे’ प्रयत्न

एला याने एका मुलाखतीत सांगितले की, हा व्यवसाय दिसायला सोपा असला तरी प्रत्यक्षात तो खूप आव्हानात्मक आहे. प्रत्येक क्लायंट वेगळा असतो. काहीजण भावनिकदृष्ट्या खूप कमजोर असतात तर काही वेळा काही क्लायंट वैयक्तिक मर्यादा ओलांडण्याचाही प्रयत्न करतात.

मात्र एला स्पष्ट नियमांचे पालन करते. प्रोफेशनल कडलिंगमध्ये कोणत्याही प्रकारची लैंगिक सेवा दिली जात नाही. हा व्यवसाय पूर्णपणे भावनिक आधार आणि ‘प्लॅटॉनिक टच’वर आधारित असल्याचे ती सांगते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *