Headlines

मुख्यमंत्री बनताच विजय यांच्याकडून 10 लाख कोटींच्या कर्जाचा उल्लेख; भडकले स्टॅलिन, म्हणाले “तुम्हाला माहीत असतानाही..”

मुख्यमंत्री बनताच विजय यांच्याकडून 10 लाख कोटींच्या कर्जाचा उल्लेख; भडकले स्टॅलिन, म्हणाले “तुम्हाला माहीत असतानाही..”
मुख्यमंत्री बनताच विजय यांच्याकडून 10 लाख कोटींच्या कर्जाचा उल्लेख; भडकले स्टॅलिन, म्हणाले “तुम्हाला माहीत असतानाही..”


टीव्हीकेचे प्रमुख आणि अभिनेते विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेताच त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. यामध्ये 200 युनिट मोफ वीज, महिलांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स यांसारख्या काही मोठ्या मुद्द्यांचा समावेश होता. यादरम्यान त्यांनी तमिळनाडू राज्यावर 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज असल्याचाही उल्लेख केला. याच उल्लेखावर आता माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर त्यांनी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. तमिळनाडू सरकारकडे पैसेच नाहीत, असं लगेच म्हणायला सुरुवात करू नका, असं त्यांनी म्हटलंय.

काय म्हणाले स्टॅलिन?

‘तमिळगा वेत्री कझगमचे नेते विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पदभार स्वीकारताच त्यांनी ज्या घोषणांवर स्वाक्षरी केली, त्याचंही मी स्वागत करतो. पण सरकारकडे पैसाच नाही, असं लगेच म्हणायला सुरुवात करू नका. सरकारकडे पैसा नक्कीच आहे. परंतु तो पैसा जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या इच्छाशक्तीची आणि शासन चालवण्याच्या क्षमतेची गरज आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही कोविड आणि महापूर यांसारख्या अनेक समस्यांशी तसंच केंद्र सरकारमधील भाजपच्या उपेक्षेशी झुंज देत असतानाही जनतेसाठी असंख्य कल्याणकारी योजना राबवल्या. तुम्ही तुमच्या पहिल्याच भाषणात असा आरोप केला की, मागील सरकारने 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज मागे ठेवलं आहे आणि राज्याचा खजिना रिकामा केला आहे. परंतु तमिळनाडूच्या कर्जाची ही पातळी विहित मर्यादेच्या आतच आहे,’ असं स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं.

या ट्विटमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘तमिळनाडू सरकारच्या आर्थिक स्थितीबद्दल आम्ही फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पातच स्पष्टीकरण दिलं होतं. तुम्हाला याची कल्पना नव्हती का? त्यानंतर तुम्ही जनतेला विविध आश्वासनं दिली होती ना? ज्या जनतेनं तुम्हाला मतं दिली, त्यांची पुन्हा फसवणूक करू नका आणि मूळ विषयावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नका. ‘मी केवळ अशीच आश्वासनं देईन जी प्रत्यक्ष अंमलात आणणं शक्य आहे’, असं सांगून सत्तेत आलेले तुम्ही आता कुठे सरकारी, प्रशासन कामकाजात पाऊल ठेवत आहात. मला विश्वास आहे की, आमच्याप्रमाणेच तुम्हीसुद्धा जनतेला दिलेली आश्वासनं कशी पूर्ण करायची, यातील बारकावे लवकरच शिकून घ्याल. आपल्या मतदान करणाऱ्या जनतेसोबतच माझीही तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे.’ या पोस्टच्या अखेरीस स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *