Headlines

Thalapathy Vijay : थलपती विजय दोन विधानसभा मतदारसंघातून लढले, आता दिला एका मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा

Thalapathy Vijay : थलपती विजय दोन विधानसभा मतदारसंघातून लढले, आता दिला एका मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा
Thalapathy Vijay : थलपती विजय दोन विधानसभा मतदारसंघातून लढले, आता दिला एका मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा


थलपती विजय यांनी दिला आमदारकीचा राजीनामा Image Credit source: टीव्ही 9 मराठी

थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये यावेळच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या, टीव्हीकेचे उमेदवार तब्बल 108 जागांवर विजयी झाले. टीव्हीकेनं सत्ताधारी डीएमके आणि एआयएडीएमके यांना जबरदस्त धक्का दिला. हा धक्का एवढा मोठा होता की स्टॅलिन देखील पराभूत झाले. मात्र जरी थलपती विजय यांना 108 जागा मिळाल्या असल्या तरी देखील ते बुहमतापासून 10 जागा दूर होते. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता होती. शेवटी थलपती विजय यांनी काँग्रेससह छोट्या-मोठ्या पक्षांचा पाठिंबा मिळून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आणि रविवारी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ देखील घेतली आहे.

दरम्यान थलपती विजय यांनी दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते दोन्ही जागेंवर विजयी झाले होते. थलपती विजय यांच्या पक्षाच्या आमदारांची एकून संख्या 108 होती, मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार थलपती विजय यांनी एका मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे थलपती विजय यांच्या पक्षाकडे आता 107 च आमदार आहेत. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभेचे प्रमुख सचिव के, श्रीनिवासन यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

दरम्यान रविवारी थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान मुख्यमंत्रिपदाची शपत घेताच थलपती विजय यांनी मोठी घोषणा केली आहे. आता तामिळनाडूमध्ये फक्त एकच सत्ताकेंद्र असणार आहे, ते म्हणजे मी स्वत: थलपती विजय असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान थलपती विजय यांची ही घोषणा सत्ताधारी मित्र पक्षांसोबतच विरोधकांना देखील इशारा मानला जात आहे. तसेच मी तामिळनाडूमध्ये काहीही चुकीच होऊ देणार नाही, तसेच चुकीचं होत असेल तर ते देखील सहन करणार नाही असंही यावेळी थलपती विजय यांनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *