Headlines

RCB vs MI : आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय, मुंबईवर 2 विकेट्सने मात

RCB vs MI : आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय, मुंबईवर 2 विकेट्सने मात
RCB vs MI : आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय, मुंबईवर 2 विकेट्सने मात


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) रविवारी 10 मे रोजी डबल हेडरचा थरार पार पडला. या डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूण 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स टीमने गुजरात टायटन्सला पराभूत करत प्लेऑफच्या दिशेने जबरदस्त वाटचाल सुरु ठेवली आहे. तर डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने विजयी धावांचा पाठलाग करताना चिवट खेळी केली. त्यामुळे आरसीबीला शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. आरसीबीने 2 धावा करत 2 गुणांची कमाई केली. आरसीबीने यासह प्लेऑफचा दावा आणखी मजबूत केला आहे. भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या हे दोघे आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

मुंबईची टॉप ऑर्डर ढेर

आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भुवनेश्वर कुमारने 3 ओव्हरमध्ये मुंबईची टॉप ऑर्डर उद्धवस्त केली. भुवीने रायन रिकेल्टन, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रायने 2 धावा केल्या. रोहितला चांगली सुरुवात मिळाली. मात्र रोहित 22 धावांपर्यंतच पोहचू शकला. तर सूर्यकुमार यादव याला तर भोपळाही फोडता आला नाही.

मुंबईची झटपट 3 विकेट्स गमावल्याने नाजूक स्थिती झाली. मात्र त्यानंतर नमन धीर आणि तिलक वर्मा या दोघांनी कमाल केली. दोघांनी 82 धावांची भागीदारी करुन मुंबईला 100 पार पोहचवलं. नमन धीरचं अर्धशतक 3 धावांनी हुकलं. नमनने 47 धावा केल्या. नमनला रसीख सलाम डार याने आऊट केलं. त्यानंतर भुवनेश्वर कुमार याने सेट तिलक वर्मा याला आऊट करत आरसीबीला मोठी विकेट मिळवून दिली. तिलकने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. तिलकने 57 धावा केल्या. तसेच इतरांनीही छोटेखानी खेळी केली. तर आरसीबीसाठी भुवीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या.

आरसीबीची बॅटिंग

मुंबईने 167 धावांचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीला पावरप्लेमध्ये 3 झटके दिले. दीपक चाहर याने यात प्रमुख योगदान दिलं. दीपकने पहिल्याच ओव्हरमध्ये विराट कोहली याला झिरोवर आऊट केलं. दीपकने त्यानंतर देवदत्त पडीक्कल याला 12 धावांवर आऊट केलं. तर कॉर्बिन बॉश याने आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याची शिकार केली. रजतने 8 धावा केल्या.

त्यानंतर कृणाल पंड्या आणि जेकब बेथल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 55 धावा जोडल्या. बेथलने 27 धावा केल्या. कृणाने एक बाजू लावून धरलेली. कृणालने 32 चेंडूत अर्धशतक लगावलं. जितेश शर्मा याने 3 चौकार लगावत टॉप गिअरमध्ये फटकेबाजी करुन वेग वाढण्याचा प्रयत्न केला. मात्र जितेशच्या खेळीचा 18 धावांवर शेवट झाला. मात्र कृणाल पूर्ण ताकदीने खेळत होता. कृणालने 18 ओव्हरमध्ये 2 षटकार खेचले. मात्र कृणाल (73) आणि टीम डेव्हिड (0) दोघे सलग बाद झाले.

स्कोअरकार्ड

आरसीबीचा सनसनाटी विजय

आरसीबीला शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज होती. राज अंगद बावा याने रोमरियो शेफर्ड याला आऊट केलं. मात्र भुवनेश्वर कुमार याने मैदानात येताच षटकार लगावला. त्यामुळे शेवटच्या 2 चेंडूत 3 धावांची गरज होती. भुवीने 1 धाव काढली. त्यामुळे रसीख सलाम डार स्ट्राईकवर आला. आरसीबीला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 2 रन्सची गरज होती. रसीखने 2 धावा केल्या आणि आरसीबीने रोमहर्षक विजय मिळवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *