Headlines

Viral Video: आंबा खाण्याआधी हा व्हिडीओ पाहा, लिंबाचा तुकडा भेसळ उघडकीस आणणार

Viral Video: आंबा खाण्याआधी हा व्हिडीओ पाहा, लिंबाचा तुकडा भेसळ उघडकीस आणणार
Viral Video: आंबा खाण्याआधी हा व्हिडीओ पाहा, लिंबाचा तुकडा भेसळ उघडकीस आणणार


Viral Video: फळांचा राजा आंबा कोणाला आवडत नाही. आंबे न आवडणारा विरळाच…परंतू हे तुम्हाला माहिती आहे का कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे तुमच्या शरीरासाठी विषा समान आहेत. या संदर्भात सोशल मीडियावर @jyotiscookingchannel हँडलने एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात दावा केला जात आहे की एक लिंबाच्या मदतीने आंबा केमिकलने पिकवला आहे का नाही ते कळणार आहे. त्यामुळे केमिकल युक्त आंब्याची चाचणी घरच्या घरी करता येणार आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ एक व्यक्ती आंब्यावर लिंबू रगडताना दिसत आहे. पाहाता पाहात या आंब्याचा पृष्टभाग आणि जांभळी आणि नंतर काळी पडते. या व्हिडीओ दावा केला जात आहे की जर समजा आंब्याचा रंग बदलला तर आंबा खतरनाक केमिकल कॅल्शियम कार्बाईडने पिकवल्याचे स्पष्ट होते. जर रंग बदलला नाही तर आंबा संपूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे.

लिंबूच्या टेस्टचे सत्य काय ?

एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की ही टेस्ट 100 टक्के अचूक नाही. लिंबूत सायट्रिक एसिड असते. जेव्हा या आंब्याच्या सालीवर पेस्टीसाईड वा नैसर्गिक रसायन म्हणजे फिनोलसोबत प्रतिक्रीया करते तेव्हा ऑक्सीकरणामुळे रंग बदलू शकतो. याचा अर्थ हा नाही की प्रत्येक रंग बदलणारा आंबा विषारी आहे. परंतू हे देखील सत्य आहे की कॅल्शियम कार्बाइड आरोग्यासाठी धोकादायक आहे. हे एक प्रकारचे स्लो पॉयझन आहे. ज्यामुळे चक्कर येणे, पोटात जळजळ आणि कॅन्सरसारखे घातक आजार होऊ शकतात.

वाटर टेस्ट आहे सर्वात विश्वासार्ह !

जर तुम्हाला खरेच जाणायचे आहे की आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे की नाही तर आंब्याला आधी पाण्याने भरलेल्या बादलीत टाकावे. जर समजा आंबा पाण्यात बुडाला आणि बादलीच्या तळाशी गेला तर समजावे की आंबा नैसर्गिक पिकलेला आहे. जर जो तरंगू लागला तर याचा अर्थ त्याला केमिकल्सच्या मदतीने पिकवलेले आहे. खाण्याआधी आंबा पाण्यात ठेवल्याने आंब्याची उष्णता देखील कमी होते.

येथे पाहा व्हिडीओ –





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *