Headlines

भारतीयांना सोन्याची भारीच हौस, एका दिवसात तब्बल इतक्या हजार कोटींची खरेदी, आकडा वाचून चकित व्हाल

भारतीयांना सोन्याची भारीच हौस, एका दिवसात तब्बल इतक्या हजार कोटींची खरेदी, आकडा वाचून चकित व्हाल
भारतीयांना सोन्याची भारीच हौस, एका दिवसात तब्बल इतक्या हजार कोटींची खरेदी, आकडा वाचून चकित व्हाल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक वर्ष सोनं न खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पहायला मिळत आहेत. कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने वापरणाऱ्या देशांपैकी एक मानला जातो. भारतात सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून परंपरा आणि सामाजिक प्रतिष्ठेशीही जोडलेले आहे. लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि विशेष प्रसंगी सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे देशात दरवर्षी सुमारे 800 ते 900 टन सोन्याचा वापर होतो. आज आपण भारतीय लोक किती रुपयांचे सोने खरेदी करतात ते जाणून घेऊयात.

दररोज इतक्या हजार कोटींची खरेदी

देशात खरेदी केल्या जाणाऱ्या एकूण सोन्यापैकी जवळपास 75 टक्के सोने दागिन्यांच्या स्वरूपात असते. याशिवाय लोक गोल्ड कॉइन आणि गोल्ड बारमध्येही गुंतवणूक करतात. दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडू ही राज्ये सोन्याच्या खरेदीत आघाडीवर मानली जातात. येथे सोन्याची मागणी खूप जास्त आहे. भारतात दररोज सुमारे 2,200 कोटी रुपयांचे सोने खरेदी केले करतात. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, भारतात दररोज सरासरी 2.2 टन म्हणजेच जवळपास 2,200 किलो सोन्याची खरेदी केली जाते.

भारत सोने कुठून आयात करतो?

भारतात सोने मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जात असले तरी सोन्याचे देशांतर्गत उत्पादन अत्यंत कमी आहे. त्यामुळे देशाला आपल्या गरजेपैकी जवळपास 99 टक्के सोने परदेशातून आयात करावे लागते. भारत सर्वाधिक सोने स्वित्झर्लंडमधून आयात करतो. या देशातून आयातीचा आकडा सुमारे 40 टक्के आहे. त्यानंतर युएई, दक्षिण आफ्रिका आणि पेरू या देशांकडूनही मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जाते.

सध्या जागतिक पातळीवरील तणावामुळे आणि सोन्याच्या वाढत्या आयात खर्चामुळे पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना अनावश्यक सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन केले आहे. गरजेपेक्षा जास्त सोन्याची आयात देशाचा व्यापार तुटीचा भार वाढवते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सोन्याचे आयात शुल्क 6 टक्क्यांवरून वाढवून 15 टक्के केले आहे. त्यामुळे आज सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *