Headlines

Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!

Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!


तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा दावा समोर आला आहे. अभिनेता-राजकारणी थलपती विजय यांच्या पक्षाशी संबंधित काही आमदारांना कथितरीत्या कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विजय यांच्या पक्षातील सुमारे 15 आमदारांना ₹35 ते ₹50 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या कथित प्रकरणामागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, चेन्नईच्या गुप्तचर विभागाकडून या प्रकरणाची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात सेंथिल बालाजी आणि करूर गँग यांची नावे चर्चेत आली असल्याचा दावा केला जात आहे. तसेच या कथित षडयंत्रप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, विजय यांच्या राजकीय वाटचालीवर परिणाम करण्यासाठी पुढील काही महिन्यांत हालचाली सुरू असल्याचा दावाही केला जात आहे. या घडामोडींमुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणाच्या अधिकृत तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *