Headlines

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटामुळे रितेश देशमुखचा नवा रेकॉर्ड; मराठीत लागोपाठ चौथ्यांदा..

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटामुळे रितेश देशमुखचा नवा रेकॉर्ड; मराठीत लागोपाठ चौथ्यांदा..
Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटामुळे रितेश देशमुखचा नवा रेकॉर्ड; मराठीत लागोपाठ चौथ्यांदा..


छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. या मराठी चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर वीकेंडला कमाईला आणखी गती मिळाली. परंतु दुसऱ्या आठवड्यात अपेक्षेपेक्षा कमाई थोडी कमी झाली. असं असलं तरी या चित्रपटाने हिंदी आवृत्तीच्या तुलनेत मराठीत लक्षणीय कामगिरी केली आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपये कमावले, ते पाहुयात..

‘सॅकनिल्क’च्या ताज्या रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या बुधवारी 1.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यामुळे या चित्रपटाची देशातील कमाई 75.05 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ‘राजा शिवाजी’ची 11.35 कोटी रुपयांनी ओपनिंग झाली होती. त्यानंतर पहिल्या शनिवारी 10.55 कोटी रुपये आणि पहिल्या रविवारी 12 कोटी रुपये कमावले होते. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाच्या कमाईचा एकूण आकडा 52.65 कोटी रुपयांवर पोहोचला होता. दुसऱ्या रविवारी चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झाली. यादिवशी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने 6.80 कोटी रुपये कमावले होते.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा बजेट 75 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे रितेशच्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 13 दिवसांत बजेटचा आकडा पार केला आहे. आता यापुढे होणारी कमाई हा चित्रपटाचा नफा असेल. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटासह रितेश देशमुखने लागोपाठ चौथा मराठी यशस्वी चित्रपट दिला आहे. याआधी ‘लय भारी’, ‘माऊली’, ‘वेड’ या चित्रपटांनाही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं होतं. तर दिग्दर्शक म्हणून रितेशचा हा दुसरा मराठी चित्रपट आहे. याआधी 2022 मध्ये त्याने ‘वेड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं असून जिनिलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’, ‘जिओ स्टुडिओज’ने निर्मिती केली आहे. रितेशसोबत या चित्रपटात जिनिलिया, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, बोमन इराणी, विद्या बालन यांच्याही भूमिका आहेत. तर सलमान खानने यामध्ये जिवा महालाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाच्या दोन्ही मुलांनी विविध टप्प्यांतील बाल शिवरायांची भूमिका साकारली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *