Headlines

Petrol-Diesel Price Today : ज्याची भीती तेच घडले, मोठा दणका, थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ, तब्बल..

Petrol-Diesel Price Today : ज्याची भीती तेच घडले, मोठा दणका, थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ, तब्बल..
Petrol-Diesel Price Today : ज्याची भीती तेच घडले, मोठा दणका, थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ, तब्बल..


आंतरराष्ट्रीय बाजारात रूपया घसरत आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम होत आहे. सोने आणि चांदीच्या भावानंतर सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले आहेत. साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. इराण अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजी गॅस, पेट्रोल डिझेल यांची मोठी समस्या आहे. भारत मोठे प्रयत्न पेट्रोल आणि डिझेल भारतात आणण्याकरिता प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे मोठे आवाहन केले. एक वर्षाकरिता सोने खरेदी न करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यानंतर आता थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सतत रूपयाची घसरण सुरू आहे. त्याचेच परिणाम आता बघायला मिळत आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाची झळ थेट भारतीय नागरिकांना सहन करावी लागत आहे. सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोल डिझेल याच्या किमतीत वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति 3 रूपयांनी वाढ करण्यात आली. हा सर्वसामान्य लोकांना मोठा झटका म्हणावा लागणार आहे. आता मुंबईत पेट्रोल 106.50 वर गेले तर डिझेल 93 रूपयांवर पोहोचले आहे.

सरकारकडून हे नवे दर आजपासून लागू करण्यात आलेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भाव वाढल्याने ही वाढ केल्याचे सांगितेल जातंय. सरकारने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले जाणार नाहीत. मात्र, इराण आणि अमेरिका युद्धात सतत जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. यादरम्यानच आता भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवण्यात आलेत.

भारताच्या शेजारील देशांमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगणाला पोहोचले आहेत. सरकारने काल साखर निर्यातीवरील बंदीबाबत मोठा निर्णय घेतला आणि आज लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ करण्यात आली. सध्याच्या परिस्थितीला मार्ग काढण्याकरिता सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. आता टॅक्सीचालक आणि रिक्षाचालकही भाडेवाढ करण्याचे संकेत आहेत.

विविध शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर
मुंबई
पेट्रोल- 106.68 रुपये प्रति लिटर (3.14 रुपयांची वाढ)
डिझेल- 93.14 रुपये प्रति लिटर (3.11 रुपयांची वाढ)
अमरावती
पेट्रोल- 108.24 रुपये प्रति लिटर
डिझेल- 94.74 रुपये प्रति लिटर
नाशिक
पेट्रोल- 107.93 रुपये प्रति लिटर
डिझेल- 94.41 रुपये प्रति लिटर
छत्रपती संभाजीनगर
पेट्रोल- 108.56 रुपये प्रति लिटर
डिझेल- 94.78 रुपये प्रति लिटर
रत्नागिरी
पेट्रोल- 108.63 रुपये प्रति लिटर
डिझेल- 95.12 रुपये प्रति लिटर
वसई-विरार
पेट्रोल- 107.21 रुपये प्रति लिटर
डिझेल- 93.68 रुपये प्रति लिटर
नागपूर
पेट्रोल- 107.18 रुपये प्रति लिटर
डिझेल- 93.69 रुपये प्रति लिटर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *