Headlines

Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल

Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल


मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला असून, नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक सध्या संथ गतीने सुरू असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

माहितीनुसार, नालासोपारा स्थानकावरील चारही रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लोकल गाड्या कमी वेगाने चालवण्यात येत असून, अनेक गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

लोकल सेवेतील विलंबामुळे सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेल्या हजारो नोकरदार आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परतीच्या प्रवासातही प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होत असून, उशिरामुळे अनेकांचे दैनंदिन वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वे सेवेची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *