Headlines

Mumbai Missing Link | मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची 3 वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं….

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असून, या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या एका बसने समोरून जाणाऱ्या तीन खासगी वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य राबवत जखमींना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या भीषण अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *