Headlines

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावर पुन्हा रणसंग्राम? 8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावर पुन्हा रणसंग्राम? 8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावर पुन्हा रणसंग्राम? 8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा आरोप करत, “आता आंदोलनाशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नाही,” असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. “ज्या दिवशी आंदोलनाची तारीख निश्चित होईल, त्याच दिवशी मोठं आंदोलन उभं राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे यांनी प्रश्न उपस्थित करत विचारले की, “आठ महिने उलटून गेले तरी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का देण्यात आले नाही?” त्यांनी शिंदे समितीवरही गंभीर आरोप करत, कुणबी नोंदी शोधण्याचे काम जवळपास ठप्प झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा नाराजी वाढताना दिसत आहे.
दरम्यान, आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीनंतर जरांगे समाजाशी संवाद साधणार असून, पुढील आंदोलनाची दिशा आणि भूमिका जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी सप्टेंबर 2025 मध्ये आझाद मैदान येथे मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा करत आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात समाजाला कोणताही ठोस फायदा झालेला नसल्याची भावना आता वाढू लागली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीचा आणि आजच्या बैठकीचा काही संबंध आहे का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेेद्र फडणवीस यांच्याविरोधात जरांगे आज अधिक आक्रमक भूमिका घेतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *