Headlines

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का? बडा खासदार शिंदेंच्या भेटीला, राजकारणात मोठी उलथापालथ?

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का? बडा खासदार शिंदेंच्या भेटीला, राजकारणात मोठी उलथापालथ?
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का? बडा खासदार शिंदेंच्या भेटीला, राजकारणात मोठी उलथापालथ?


गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. अनेक नेत्यांनी पक्षांतर केलेले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत अनेक आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर अजित पवारांनीही राष्ट्रवादीतील आमदार सोबत घेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अनेक नेत्यांनी पक्षांतर केले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवले होते. अशातच आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरेंचा खासदार शिंदेंच्या भेटीला

समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे यांची भेट घेण्यासाठी नंदनवन या निवासस्थानी पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे.

भेट कशासाठी?

हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. स्थानिक विकास कामांसंदर्भात ही भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या भेटीमागील कारण वेगळंच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या भेटीबाबत आष्टीकर काही खुलासा करणार का याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा

गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. या 6 खासदारांचा पक्षप्रवेशही वरिष्ठांच्या परवानगीनंतर होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी असा कोणताही पक्षप्रवेश होणार नाही, तसेच ऑपरेशन टायगर सक्रीय नसल्याची माहिती दिली होती. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. मात्र आता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *