Headlines

RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Score Updates And Highlights : आरसीबी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, पराभवानंतर गुजरातला मिळणार आणखी एक संधी

RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Score Updates And Highlights : आरसीबी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, पराभवानंतर गुजरातला मिळणार आणखी एक संधी
RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Score Updates And Highlights : आरसीबी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, पराभवानंतर गुजरातला मिळणार आणखी एक संधी


The liveblog has ended.

  • 26 May 2026 11:44 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : आरसीबी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, पराभवानंतर गुजरातला मिळणार आणखी एक संधी

    आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील प्लेऑफमधील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने होते.  या क्वालिफायर 1 सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. आरसीबीने या सामन्यात गुजरात टायटन्सवर 92 धावांच्या फरकाने विजय मिळवला. आरसीबीने विजयासाठी 255 धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरात टायटन्सला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. आरसीबीने गुजरातला 19.3 ओव्हरमध्ये 162 रन्सवर ऑलआऊट केलं. आरसीबीने अशाप्रकारे 92 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

  • 26 May 2026 11:41 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : राहुल तेवतिया बाद

    राहुल तेवतियाच्या रुपाने गुजरात टायटन्सला नववा धक्का बसला. राहुल तेवतिया 68 धावा करून बाद झाला. गुजरात टायटन्सचा पराभव निश्चित झाला आहे.

  • 26 May 2026 10:56 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : राशिद खान आऊट, गुजरातला सातवा झटका

    जेकब डफी याने राशिद खान याला विकेटकीपर जितेश शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. यासह गुजरातने सातवी विकेट गमावली आहे. राशिदने 8 धावा केल्या.

  • 26 May 2026 10:46 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : वॉशिंग्टन सुंदर आऊट, गुजरातचा सहावा भिडू माघारी, आरसीबी विजयाच्या दिशेने

    जेकब डफी याने वॉशिंग्टन सुंदर याला आऊट करत गुजरातला सहावा झटका दिला आहे.  वॉशिंग्टन सुंदर याने 8 बॉलमध्ये 8 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 26 May 2026 10:29 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : जेसन होल्डर डक, गुजरातचा अर्धा संघ तंबूत

    रसीख सलाम डार याने गुजरातला एकाच ओव्हरमध्ये दुसरा झटका दिला आहे. रसीखने निशांत सिंधूू याला आऊट केलं.  त्यानंतर रसीखने जेसन होल्डर याला झिरोवर आऊट केलं. आरसीहबीने यासह गुजरातला पाचवा झटका दिला.

  • 26 May 2026 10:27 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : निशांत सिंधू आऊट, गुजरातला चौथा झटका, आरसीबी मजबूत स्थितीत

    आरसीबीने गुजरातला चौथा झटका दिला आहे. रसीख सलाम डार याने सहाव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर आपल्याच बॉलिंगवर निशांत सिंधू याला कॅच आऊट केलं. निशांत याने 5 रन्स केल्या.

  • 26 May 2026 10:25 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : जोस बटलर बोल्ड, जोश हेझलवूडला पहिली विकेट, गुजरातला तिसरा झटका

    जोश हेझलवूड याने जोस बटलर याला बोल्ड करुन गुजरातला तिसरा झटका दिला आहे. जोसने 11 बॉलमध्ये 29 रन्स केल्या. जोस आऊट झाल्याने गुजरातची स्थिती 5 ओव्हरमध्ये 3 आऊट 51 अशी झाली आहे.

  • 26 May 2026 10:15 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : कॅप्टन शुबमन गिल बोल्ड, भुवनेश्वर कुमारकडून गेम ओव्हर, गुजरातला दुसरा धक्का

    भुवनेश्वर कुमार याने गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल याचा गेम ओव्हर केला आहे. भुवीने शुबमनला आपल्या कोट्यातील दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर  2 रन्सवर बोल्ड केलं.

  • 26 May 2026 10:12 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : दुर्देवी साई सुदर्शन, गुजरातचा ओपनर असा आऊट, आरसीबीला पहिलं यश

    गुजरात टायटन्सचा ओपनर साई सुदर्शन दुर्देवीरित्या आऊट झाला आहे. जेकब डफी याने टाकलेल्या तिसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर साईने फटका मारला. साईने मारलेल्या फटक्यावर 4 रन्स मिळाल्या. मात्र या दरम्यान साईच्या हातातून सुटलेली बॅट ही स्टंपला लागली. अशाप्रकारे गुजरातने पहिली विकेट गमावली. साई अशाप्रकारे 14 रन्सवर हिट विकेट झाला.

  • 26 May 2026 09:56 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : गुजरातच्या बॅटिंगला सुरुवात, शुबमन-साई मैदानात, 255 धावांचं आव्हान

    गुजरात टायटन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. गुजरातकडून कॅप्टन शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. आरसीबीने गुजरातसमोर 255 धावांचं आव्हान ठेवलं आहे.  आरसीबीकडून जेकब डफी पहिली ओव्हर टाकत आहे.

  • 26 May 2026 09:24 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : आरसीबीचा तडाखा, गुजरातसमोर 255 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्ससमोर 255 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने गुजरात विरुद्ध 5 विकेट्स गमावून 254 धावा केल्या. आरसीबीसाठी कॅप्टन रजत पाटीदार याने सर्वाधिक आणि नाबाद 93 धावा केल्या. आता गुजरात या धावांचा पाठलाग करताना कशी सुरुवात करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 May 2026 09:10 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : टीम डेव्हीड बोल्ड, आरसीबीला पाचवा धक्का

    टीम डेव्हीड मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात प्रसिध कृष्णा याच्या बॉलिंगवर बोल्ड झाला आहे. टीमने 5 बॉलमध्ये 4 रन्स केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 26 May 2026 09:04 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : रजत पाटीदारचं अर्धशतक, आरसीबी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने

    कॅप्टन रजत पाटीदार याने गुजरात विरुद्ध 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. रजतचं हे आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील पाचवं अर्धशतक ठरलं. आरसीबीने यासह मोठ्या धावसंख्येच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.

  • 26 May 2026 09:02 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : आरसीबीला चौथा झटका, कृणाल पंड्या आऊट

    कगिसो रबाडा याने सेट कृणाल पंड्या याला आऊट करत आरसीबीला चौथा झटका देण्यासह वैयक्तिक दुसरी विकेट मिळवली आहे. रबाडा याने आपल्या बॉलिंगवर कृणालला साई सुदर्शन याच्या हाती कॅच आऊट केलंं. कृणालने 28 बॉलमध्ये 43 रन्स केल्या.

  • 26 May 2026 08:52 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : कॅप्टन रजत पाटीदारचा तडाखा, गुजरात विरुद्ध फटकेबाजी

    आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने गिअर बदलला आहे. रजत आणि कृणाल पंड्या या दोघांनी 15 व्या ओव्हरमध्ये कुलवंत खेजरोलिया याच्या बॉलिंगवर 28 धावांची कमाई केली आहे. यासह गुजरातने 15 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 168 धावा केल्या आहेत.

  • 26 May 2026 08:40 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : कॅप्टन पाटीदार-कृणालने आरसीबीला सावरलं, गुजरात विकेटच्या शोधात

    जेसन होल्डर याने आरसीबीला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं. त्यामुळे आरसीबी अडचणीत सापडली. मात्र त्यानंतर कॅप्टन रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या याने जोडीने आरसीबीला सावरलं आहे.  या दरम्यान गुजरातने आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याला 2 जीवनदान दिले. त्यामुळे गुजरातला ही चूक किती महागात पडणार हे 20 ओव्हरनंतरच समजेल.

  • 26 May 2026 08:20 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : जेसन होल्डरचा धमाका, आरसीबीला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके, विराट-देवदत्त आऊट

    जेसन होल्डर याने धमाका केला आहे. होल्डरने आरसीबीला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. होल्डरने आधी विराटला बोल्ड केलं. त्यानंतर देवदत्त पडीक्कल याला विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट केलं. विराटने 43 आणि देवदत्तने 30 धावा केल्या.

  • 26 May 2026 08:16 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : आरसीबीला विराट झटका, कोहली बोल्ड, होल्डरकडून शिकार

    जेसन होल्डर याने विराट कोहली याला बोल्ड करुन आरसीबीला मोठा झटका दिला आहे. विराट कोहली याने 25  बॉलमध्ये 43 रन्स केल्या. विराटने या खेळीत 1 सिक्स आणि 5 चौकार लगावले.

  • 26 May 2026 08:09 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : विराट कोहली-देवदत्त पडीक्कल जोडी जमली, गुजरात दुसऱ्या विकेटच्या शोधात

    विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल जोडी जमली आहे दोघांनी आरसीबीला 7 ओव्हरनंतर 1 आऊट 86 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. विराट 21 बॉलमध्ये 40 रन्सवर खेळत आहेत. तर देवदत्तने 14 बॉलमध्ये नॉट आऊट 27 रन्स केल्या आहेत.

  • 26 May 2026 07:55 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : आरसीबीचं अर्धशतक पूर्ण, विराट-देवदत्त पडीक्कल मैदानात

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात विरुद्ध जबरदस्त सुरुवात केली आहे. आरसीबीने जीटी विरुद्ध पहिल्या 4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 50 धावा केल्या आहेत. विराट कोहली 14 आणि देवदत्त 17 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 26 May 2026 07:46 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Score Updates : आरसीबीला पहिला झटका, वेंकटेश अय्यर आऊट, शुबमनकडून कडक कॅच

    कगिसो रबाडा याने वेंकटेश अय्यर याला आऊट करत आरसीबीला पहिला झटका दिला आहे. कॅप्टन शुबमन गिल याने रबाडाच्या बॉलिंगवर वेंकटेशचा उलट धावत अप्रतिम कॅच घेतला. वेंकटेशने 7 बॉलमध्ये 19 रन्स करुन आरसीबीला स्फोटक सुरुवात करुन देण्याचा प्रयत्न केला. मात्र याच प्रयत्नात तो आऊट झाला.

  • 26 May 2026 07:32 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : सामन्याला सुरुवात, आरसीबीची बॅटिंग, विराट-वेंकटेश सलामी जोडी मैदानात

    आरसीबी विरुद्ध गुजरात क्वालिफायर 1 सामन्याला सुरुवात झाली आहे.  गुजरातने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आरसीबीकडून विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर ही सलामी जोडी मैदानात आहे. तर गुजरातसाठी मोहम्मद सिराज पहिली ओव्हर टाकण्यासाठी सज्ज आहे.

  • 26 May 2026 07:11 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : वेंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, जोश हेझलवूड आणि रसिक सलाम दार.

  • 26 May 2026 07:10 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन

    गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, कुलवंत खेजरोलिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

  • 26 May 2026 07:04 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : गुजरातने टॉस जिंकला, आरसीबी विरुद्ध निर्णय काय?

    गुजरात टायटन्सने क्वालिफायर 1 सामन्यात टॉस जिंकला आहे. गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गुजरातचे गोलंदाज आरसीबीला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 May 2026 06:50 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : आरसीबी आणि गुजरात सामना, थोड्याच वेळात टॉस

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामन्याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. कोणत्या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 May 2026 06:44 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : शुबमन-विराटच्या कामगिरीकडे लक्ष

    आरसीबी विरुद्ध गुजरात क्वालिफायर 1 सामन्यानिमित्ताने क्रिकेट चाहत्यांचंं शुबमन गिल आणि विराट कोहली या दोघांच्या कामगिरीकडे बारीक लक्ष असणार आहे. विराट आणि शुबमन दोन्ही खेळाडू हे त्यांच्या संघातील प्रमुख फलंदाज आहेत. त्यामुळे टीम मॅनेजमेंटंला या दोघांकडून मोठ्या खेळीची आशा असणार आहे.

  • 26 May 2026 06:36 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : आरसीबी आणि गुजरातपैकी वरचढ कोण?

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 8 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ आकड्यांवरुन तुल्यबळ असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे क्वालिफायर 1 सामन्यात कोणता संघ सरस ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 26 May 2026 06:24 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : आरसीबी आणि गुजरातची साखळी फेरीतील कामगिरी

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांची साखळी फेरीतील कामगिरी सारखीच राहिली आहे. दोन्ही संघांनी 14 पैकी 9 सामने जिंकले. आरबीसी साखळी फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानी राहिली. त्यामुळे आता क्वालिफायर 1 मध्ये कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 May 2026 06:13 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : गुजरात टायटन्स टीम

    गुजरात टायटन्स टीम : साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, कागिसो रबाडा, अर्शद खान, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्रा, रविश्रीनिवासन साई किशोर, शाहरुख खान, इशांत शर्मा, ल्यूक वुड, अशोक शर्मा, कॉनर एस्टरहुइझेन, गुरनूर ब्रार, मानव सुथार आणि जयंत यादव.

  • 26 May 2026 06:11 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार,
    सुयश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, फिलिप सॉल्ट, अभिनंदन सिंग, स्वप्नील सिंग, जॉर्डन कॉक्स, कनिष्क चौहान, जेकब डफी, रिचर्ड ग्लीसन, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा, मंगेश यादव आणि सात्विक देसवाल.

  • 26 May 2026 06:09 PM (IST)

    RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Live Updates : आरसीबी-गुजरात क्वालिफायर 1 साठी सज्ज

    आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वालिफायर 1 सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. तर पराभूत संघाला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी अतिरिक्त संधी मिळणार आहे.



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *