Headlines

Eknath Shinde Video | कुठलं काय, अरे… तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ

Eknath Shinde Video | कुठलं काय, अरे… तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ
Eknath Shinde Video | कुठलं काय, अरे… तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विधान परिषदेच्या जागावाटपावरून चर्चा सुरू असताना राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक बैठका आणि दिल्ली दौरे होऊनही अद्याप अंतिम तोडगा निघालेला नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या एका व्हिडीओने चर्चांना उधाण आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर एकनाथ शिंदे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी बाहेर आले. मात्र, पत्रकारांनी विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत प्रश्न विचारताच ते संतापल्याचे पाहायला मिळाले. “कुठलं बोलणार… काय आहे?” असे काहीसं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.

शिंदे यांच्या बदललेल्या देहबोलीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, तसेच जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *