
पृथ्वीवर असा एक समुद्र आहे, ज्याला कोणताही किनारा नाही, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. पण ही केवळ कल्पना नसून एक वैज्ञानिक आणि भौगोलिक सत्य आहे. अटलांटिक महासागराच्या मध्यभागी वसलेला ‘सरगासो सागर’ हा जगातील एकमेव असा समुद्र मानला जातो, ज्याच्या सीमा जमिनीने नाही तर समुद्री प्रवाहांनी ठरतात.