Headlines

मोठी बातमी! ‘साहेब नाही जमणार, मी उपोषण करणारच…’ जरांगे पाटलांची विखे पाटलांसमोरच घोषणा

मोठी बातमी! ‘साहेब नाही जमणार, मी उपोषण करणारच…’ जरांगे पाटलांची विखे पाटलांसमोरच घोषणा
मोठी बातमी! ‘साहेब नाही जमणार, मी उपोषण करणारच…’ जरांगे पाटलांची विखे पाटलांसमोरच घोषणा


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेवेळी जरांगे पाटलांनी उद्यापासून उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

मी उपोषण करणारच…

मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात राज्यात किती नोंदी सापडल्या यावरून चर्चा झाली. यावेळी काही मुद्द्यांवर मत-मतांतर झाले. यावेळी जरांगे पाटलांनी, ‘साहेब नाही जमणार, मी उपोषण करणारच…’ अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आता उद्यापासून जरांगे पाटलांचे उपोषण सुरू होण्याची शक्यता आहे.

आजच्या चर्चे वेळी जरांगे पाटील यांनी राज्यात 58 लाख नोंदी सापडल्याची माहिती दिली. तसेच काही नोंदी उडाल्या असं जरांगे पाटील म्हणाले. तसेच ज्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांची यादी आम्हाला द्या. आम्ही त्या मराठ्यांना सांगू की तुमची नोंद सापडली आहे. ज्यांना घ्यायचे ते प्रमाणपत्र घेतील. ज्यांना नाही घ्यायचे ते नाही घेणार.

व्हॅलिडीटी मिळत नाही

पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठवाड्यातील मराठा कुणबी आहेत. मात्र या गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळालेले नाही. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहेत, त्यांना व्हॅलिडीटी  मिळत नाहीत. मुख्यमंत्र्यांना सांगा की मराठ्यांना एकदा आरक्षण देऊन टाका. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.’

मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटलांनी यावेळी गंभीर आरोप केला. ‘मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रमाणपत्र वाटप थांबवण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत अधिकाऱ्यांना फोन करण्यात आला. त्यामुळे नोंदी आढळलेल्या लोकांना प्रमाणपत्र थांबवण्यात आले आहे. कारण फडणवीसांना विचारल्याशिवाय कोणतेही काम होत नाही’ असं जरांगे पाटलांनी म्हटले.

जरांगे पाटलांच्या आरोपावर बोलताना विखे पाटील यांनी म्हटले की, ‘फडणवीस प्रमाणपत्र थांबवण्याचे आदेश कसे देतील? त्यांच्या नावाने मुख्यमंत्री कार्यालयातून फोन केला असेल. तुम्ही फडणवीसांवर आक्षेप घेऊ नका. त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. ‘



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *