Headlines

महायुतीत खळबळ, शिवसेनेच्या या बड्या नेत्याचं बंड; थेट उमेदवारी अर्ज दाखल; पुढे काय होणार?

महायुतीत खळबळ, शिवसेनेच्या या बड्या नेत्याचं बंड; थेट उमेदवारी अर्ज दाखल; पुढे काय होणार?
महायुतीत खळबळ, शिवसेनेच्या या बड्या नेत्याचं बंड; थेट उमेदवारी अर्ज दाखल; पुढे काय होणार?


Tanaji Patil : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक पक्षांनी आपापल्या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिलेला असून संबंधित नेते प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र अजूनही काही जागांसाठी सुरू असलेलं चर्चेचं गुऱ्हाळ संपलेलं नाही. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जागांवरून वाद आहे. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला कमीत कमी तीन जागा हव्या आहेत. दरम्यान, जागावाटप अजूनही फायनल झालेलं नसताना महायुतीला मोठा आणि जबर धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने बंडाचे निशाण फडकवले असून थेट उमेदवारी अर्ज दाखल केल आहे.

महायुतीमध्ये बंड?

मिळालेल्या माहितीनुसार महायुतीला सांगली-सातारा विधानपरिषदेतून मोठा आणि जबर धक्का बसला आहे. येथे महायुतीत बिघाड होण्याची शक्यात आहे. कारण या ठिकाणी सांगलीतून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पक्षाचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक तानाजी पाटलील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.

भाजपाकडे होती जागा, पण…

तानाजी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे. त्यांच्यासोबत आटपाडी तालुक्यातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली-सातारा विधानपरिषदेची जागा ही भाजपाच्या वाट्याला गेली आहे. येथे महायुतीचा भाजपाचा उमेदवार असणे अपेक्षित आहे. परंतु त्याआधीच शिंदे यांच्या पक्षातील तानाजी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आता पुढे नेमकी काय भूमिका घेणार?

हा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिकादेखील स्पष्ट केली आहे. मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. पक्षाच्या आदेशानंतर आता आम्ही पुढची भूमिका घेऊ, असं तानाजी पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, आज आम्ही महायुतीच्या उमेदारांची यादी जाहीर करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे सांगली-सातारा या जागाचे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *