Headlines

हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर तिला सरकारी मान्यता द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला सल्ला

हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर तिला सरकारी मान्यता द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला सल्ला
हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर तिला सरकारी मान्यता द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला सल्ला


राज्यात पुणे येथील फुगेवाडी आणि हडपसर येथील विषारी दारुकांडातील मृत्यूचा आकडा १८ वर गेल्यानंतर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात दर काही वर्षांनी देशात हातभट्टी वा गावठी दारु प्यायल्याने अनेकांचे प्राण जात असतात. आता या प्रकरणात देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हातभट्टी दारूच्या विरोधात कडक कारवाई करता येत नसेल तर हातभट्टी दारूला शासनाने परवानगी द्यावी,ज्यामुळे तिच्यावर नियंत्रण ठेवता येईल,असा सल्ला सरकारला दिला आहे.

पुणे येथील पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारुमुळे झालेल्या मृतांचा आकडा हा आता १८ वर गेला आहे. या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाने देखील कारवाई केली आहे.

हातभट्टीच्या दारूच्या विरोधात कडक कारवाई करावी आणि जर हातभट्टीवर कारवाई करता येत नसेल तर या हातभट्टी दारूला शासनानेच परवानगी द्यावी,ज्यामुळे हातभट्टी दारुवर सरकारला नियंत्रण ठेवता येईल,असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारला दिला आहे.

पुण्यात विषारी दारु प्यायल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे, यावरून रामदास आठवले म्हणाले की हातभट्टी दारुवर कारवाई करता येत नसेल तर या हातभट्टी दारुला सरकारने मान्यता द्यावी म्हणजे सरकारला तिच्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल असा सल्ला आठवले यांनी सरकारला दिला आहे. पुण्यातील सर्व अवैध हातभट्टी दारू अड्डे बंद करावेत,पण दुसरीकडे हातभट्टीची दारू कितीही वेळा बंद केली तरी ती स्वस्त मिळत असल्याने पिणारे हातभट्टीची दारू पितात,  त्यामुळे ती बंद केली पाहिजे. नसेल तर मग सरकारने आता हातभट्टीला परवानगी देऊन त्याच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. सांगलीच्या जत येथे एका कार्यक्रमाला आले असताना आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मत मांडले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *