
एखादा व्यक्ती तीन वेळा मेल्यानंतरही पुन्हा जीवंत होऊ शकतो का ? ऐकायला हा चमत्कार वाटेल किंवा एखाद्या चित्रपटाचा सीन वाटू शकतो, परंतू ब्रिटनच्या रॉयल मेल कुरियर कंपनीत काम करणारे कार्ल लॉकवूड यांच्या सोबत प्रत्यक्षात असे घडले आहे. कार्ल ड्युटीवर तैनात होते तेव्हा त्यांना अचानक कार्डियक अरेस्ट ( हृदय विकाराचा झटका ) आला आणि ते बेशुद्ध होऊन पडले. मेडिकल रेकॉर्ड्सनुसार हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यंत कार्ल यांच्या हृदयाची धडधड तीन वेळा संपूर्णपणे बंद पडली होती.म्हणजे तांत्रिक दृष्ट्या ते तीन वेळा मृत्यूच्या दारात गेले होते. परंतू दरवेळी त्यांना डॉक्टरांनी सीपीआर आणि वीजेचा धक्क्याच्या मदतीने पुन्हा जीवंत केले. आज कार्ल संपू्र्णपणे ठीक असून पुन्हा कामावर परतले आहेत.
कार्ल यांच्या सोबतचा हा अपघात साल २०१९ रोजी घडला होता. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि डॉक्टर हैराण झाले होते. कार्ल कमजोर किंवा आळशी व्यक्ती नव्हते ते एकदम फिटनेस असलेले पोस्टमन होते. दिवसभर पायी चालत ते पत्रे आणि पार्स लोकांच्या घरी पोहचवत असायचे. ते नियमित एक्सरसाईज करायचे आणि त्यांना पर्वतात ट्रॅकिंग आणि अल्ट्रा रनिंगची ( मॅरेथॉनहून जास्त लांबीची शर्यत ) आवड होती. मात्र,त्यांना आधीपासूनचा ‘एट्रियल फिब्रिलेशन’ नावाचा हृदयाचा रोग होता. ज्यात हृदयाचे वरचे आणि खालचे भाग एका तालात धडधडत नाहीत. यासाठी ते नियमित औषधे घेत होते. कार्ल यांनी सांगितले की मी नेहमीच एक फिट पोस्टमन राहीलेलो आहे. त्यामुळे मला हृदय विकाराचा धक्का येणे सर्वांसाठी एक मोठा झटका होता.
दोस्त नसता तर वाचलोच नसतो
कार्ल सांगतात की ते दिवसा ऑफीसात असताना अचानक कोसळले, मात्र, त्याच्या सहकाऱ्यांनी जर त्यांना तडफत असताना वेळीच पाहिले नसते तर ते आज या जगात नसते. त्यांच्या मित्रांनी एम्बुलन्स येईपर्यंत कार्ल यांची छाती दाबली आणि त्यांना सीपीआर दिला. ज्यामुळे त्यांच्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन सुरु राहिले आणि त्यांच्या मेंदूच्या नसा फाटल्या नाहीत. ठीक झाल्यानंतर कार्ल आता पायी चालण्याऐवजी रॉयल मेलची व्हॅन चालवून पार्सल डिलिव्हर करतात. ते म्हणतात की आपल्या या दुसऱ्या जीवनामुळे आनंदी आहोत आणि आता ते आपल्या हृदयाची खास काळजी घेतात.
कर्मचाऱ्यांसाठी सुरु झाले ‘स्मार्ट’ हार्ट टेस्ट
कार्ल यांच्या चमत्कारिक कहानीनंतर ब्रिटनच्या सर्वात मोठ्या ऑनलाईन फार्मेसी ‘फार्मेसी-2यू’ (Pharmacy2U) ने रॉयल मेल कंपनीसोबत मिळून एक अभिनव मोहिम सुरु केली. या मोहिमेत कंपनीच्या १ लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना घर बसल्या किंवा डेस्कवर केवळ दहा मिनिटात कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्याची तपासणी करणारी ‘डिजिटल सेल्फ-टेस्ट किट’ मोफत देण्यात येत आहे. कंपनीचे सीईओ केव्हीन हीथ यांच्यानुसार लोक नेहमी कामाच्या व्यापात बॉडी चेकअप करणे विसरुन जातात. या डिजिटल मोहिमेचा हेतू ऑफीसात कामाच्या दरम्यान लोकांना हृदयाच्या आजाराचे वेळीच निदान होईल आणि त्यामुळे कार्ल लॉकवूड यांच्या सारखा कोणा अन्य कर्मचाऱ्याला त्रास होणार नाही.