
_uddhav Thackeray party former mla manohar chandrikapure joins shiv senaImage Credit source: Google
गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अनेक नेते पक्षांतर करताना पहायला मिळत आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. एका बड्या नेत्याने आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. हा नेता कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
गोंदिया जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत शिंदेंना गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठा फायदा होईल होणार आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 90 टक्के कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये शामिल झाले आहेत. येणाऱ्या काळात उरलेले देखील आमच्यासोबत जोडले जातील व याचा मोठा फायदा निवडणुकीत होईल असं विधान चंद्रिकापुरे यांनी केले आहे.
प्रहारमधील अनेक पदाधिकारी शिवसेनेत सामील
याआधी काल बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतील अनेक नेते, पदाधिकारी तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश होता. यात अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाखळे, दर्यापूर काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष दिलीप चव्हाण, गजानन जाधव, प्रभाकर कोरपे, राजू कराळे, गजानन देवताळे, साहेबराव भदे, राजेश खेडकर यांच्यासह अमरावती आणि दर्यापूर येथील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
25 हजार कार्यकर्त्यांसह माजी आमदार शिवसेनेत
दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने विराट मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठा पक्षप्रवेश सोहळा पहायला मिळाला. माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह तब्बल 25 हजार कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे लातूरमध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद कितीतरी पटींनी वाढली आहे.