Headlines

काँग्रेसची शाल गळ्यात घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेसमध्ये प्रवेश…

काँग्रेसची शाल गळ्यात घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेसमध्ये प्रवेश…
काँग्रेसची शाल गळ्यात घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेसमध्ये प्रवेश…


पुण्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान घडलेल्या एका मिश्किल प्रसंगाने उपस्थितांमध्ये चांगलाच हास्यकल्लोळ उडाला.

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी अर्ज भरला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनात बैठक पार पडली.

बैठकीसाठी सुप्रिया सुळे काँग्रेस भवनात दाखल झाल्यानंतर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्ष दिप्ती चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे गटनेते चंदुशेठ कदम यांनी सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात काँग्रेसची शाल घातली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी तत्काळ, “माझा काँग्रेसमध्ये प्रवेश थोडी आहे,” असे मिश्किल वक्तव्य केले. त्यांच्या या उत्तरानंतर उपस्थित नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *