Headlines

भाजपविरोधात शिंदेसेनेत मोठी खदखद… अब्दुल सत्तार, संजय गायकवाड यांच्यानंतर या आमदाराने डागली तोफ… धडाधड केले आरोप…

भाजपविरोधात शिंदेसेनेत मोठी खदखद… अब्दुल सत्तार, संजय गायकवाड यांच्यानंतर या आमदाराने डागली तोफ… धडाधड केले आरोप…
भाजपविरोधात शिंदेसेनेत मोठी खदखद… अब्दुल सत्तार, संजय गायकवाड यांच्यानंतर या आमदाराने डागली तोफ… धडाधड केले आरोप…


नरेंद्र बोंडेकर यांची भाजपवर जहरी टीकाImage Credit source: एजन्सी

MLA Narendra Bondekar on BJP: भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील धुसफूस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपविरोधात तोफ डागली आहे. त्यांनी तर दोन्ही सेनांनी एकत्र येण्याची हाक दिली आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तर भरसभेत भाजपची माप काढली. तर आता भंडाऱ्यातील आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली. त्याकडेही शिंदे सेनेने पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे हा वाद शिगेला पोहचल्याचे दिसते.

अब्दुल सत्तार-संजय गायकवाड जे बोलले ते सत्य

आमदार अब्दूल सत्तार, संजय गायकवाड नंतर आता शिवसेना नेते आमदार नरेंद्र बोंडेकर यांनीही भाजपवर नाराजी जाहीर केली आहे. अब्दूल सत्तार, संजय गायकवाड जे बोलले ते सत्य आहे. भंडारा जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. भाजप मित्रपक्षासारखा वागत नसल्यानेच आम्ही उठाव केला. भाजप नेते अपमान करत असतील तर काय करायचं? असा सवाल त्यांनी विचारला. समन्वय समितीत आमचा अपमान करणाऱ्या परिणय फुके यांना आवरायला हवं अशी मागणी त्यांनी केली.

आमच्यात सगळीकडे अस्वस्थता

भाजप मित्रपक्षा प्रमाणे वागवत नाही, शिवसेना आमदारांमध्ये सर्वत्र धुसफूस आहे, असे आमदार नरेंद्र बोंडेकर म्हणाले. भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर निधी देत नाहीत. आमच्या नगरसेवकांना निधी मिळत नाही. या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. पण ते महायुतीला मदत करणार आहेत. निवडणूक आली की १० फोन करतात, अशी टीका त्यांनी केली. भाजप नेते माझ्या विधानसभा मतदारसंघात हस्तक्षेप करतात असा आरोप आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी केला आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद अनेक ठिकाणी उफाळून आल्याचे चित्र आहे. भाजपविरोधात शिंदे सेनेचे आमदार नाराज असल्याचे दिसते. काल भंडाऱ्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारालाही शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. आमदार बोंडेकर सुद्धा या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे नाराजीच व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *