Headlines

MLC Election : महायुतीची जिल्हानिहाय उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर, कोणत्या जिल्ह्यातून कोणाला संधी? बंडखोरांना स्पेशल ऑफर

MLC Election : महायुतीची जिल्हानिहाय उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर, कोणत्या जिल्ह्यातून कोणाला संधी? बंडखोरांना स्पेशल ऑफर
MLC Election : महायुतीची जिल्हानिहाय उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर, कोणत्या जिल्ह्यातून कोणाला संधी? बंडखोरांना स्पेशल ऑफर


सध्या राज्यात विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून येत्या १८ जून रोजी विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. या अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महायुतीची एक महत्त्वपूर्ण संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केले.

रविंद्र चव्हाण यांनी नुकतंच विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीची अधिकृत भूमिका आणि रणनीती स्पष्ट केली. महायुतीमधील सर्व घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय असून, आम्ही अत्यंत ताकदीने ही निवडणूक लढवत आहोत. १८ जून रोजी होणाऱ्या मतदानात राज्यातील सर्वच्या सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अर्ज मागे घेणाऱ्यांसाठी सकारात्मक विचार

निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून महायुतीसमोर अनेक मतदारसंघांमध्ये पक्षांतर्गत बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले होते. १८ जूनच्या मतदानापूर्वी पक्षाची मते फुटू नयेत म्हणून महायुतीने बंडखोरांना शांत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यावर बोलताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीमुळे आतापर्यंत ३ प्रमुख ठिकाणची बंडखोरी पूर्णपणे शमवण्यात महायुतीला यश आले आहे.

बंडखोरांसाठी स्पशेल ऑफर काय?

तसेच ४ जून हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष किंवा बंडखोर म्हणून अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी वेळेपूर्वी वरिष्ठांशी बोलून आपले अर्ज मागे घ्यावेत, ही नम्र विनंती आहे. जे नेते पक्षाचा आदेश मानून मागे हटतील, त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा विचार केला जाईल. भविष्यात येणाऱ्या विविध शासकीय समित्या आणि महामंडळांच्या अध्यक्ष वा सदस्यपदासाठी त्यांच्या नावांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.

महायुतीची जिल्हानिहाय अधिकृत उमेदवार यादी

मतदारसंघ / जिल्हा महायुतीचे अधिकृत उमेदवार
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया अविनाश ब्राह्मंडकर
मरावती प्रवीण पोटे
सोलापूर राजेंद्र राऊत
सांगली-सातारा धैर्यशील कदम
अहिल्यानगर (अहमदनगर) प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना सुहास शिरसाट
नांदेड अमर राजूरकर
धाराशिव-बीड-लातूर बसवराज पाटील
जळगाव नंदकिशोर महाजन
नागपूर डॉ. राजीव पोतदार
ठाणे रवींद्र फाटक
यवतमाळ दृष्यंत चतुर्वेदी
परभणी-हिंगोली सय्यद खान
नाशिक नरेंद्र दराडे
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग अनिकेत तटकरे
पुणे विक्रम काकडे

१८ जून रोजी मतदान

या पत्रकार परिषदेत मविआच्या आव्हानावर बोलताना महायुतीच्या नेत्यांनी सांगितले की, विरोधकांकडे ना संख्याबळ आहे ना योग्य रणनीती. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुतांश माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्याच संपर्कात आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिकता असून १७ पैकी १७ जागांवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. राज्यात सध्या सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे वातावरण कमालीचे तापले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष ४ जूनच्या डेडलाईनकडे लागले असून १८ जून रोजी मतदान होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *