Headlines

Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!

Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!
Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!


राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या 17 जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीसमोर अनेक ठिकाणी बंडखोरीचे आव्हान उभे ठाकले आहे. उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीमुळे काही मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांमधील तणाव उघडपणे समोर येताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर विधान परिषद मतदारसंघात शिवसेना नेते अब्दूल सत्तार यांच्या मुलाने भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यानंतर सत्तार यांनी भाजपवर शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत महायुतीतील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

सत्तार यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत भाजपकडून शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. तसेच “मोठा भाऊच युती संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,” असे वक्तव्य करत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या वक्तव्यावर आता भाजप नेते गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले की, “अब्दुल सत्तार हे सध्या शिवसेनेचे मोठे नेते झाले आहेत. मात्र महायुती ठेवायची की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. अशा विषयांवर बोलताना संयम बाळगला पाहिजे.”

महाजन यांनी पुढे सांगितले की, “सत्तार माझे चांगले मित्र आहेत. मात्र त्यांनी अशा प्रकारची विधाने टाळावीत. महायुतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष नेतृत्वाचा आहे. अशा वक्तव्यांमुळे युतीत अनावश्यक गैरसमज निर्माण होऊ शकतात.” तसेच महायुतीमध्ये “मिठाचा खडा” टाकणारी वक्तव्ये टाळावीत, असा सल्लाही महाजन यांनी सत्तार यांना दिला. या सर्व घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *