Headlines

IND vs AFG: मोहम्मद सिराजचा टीम इंडियातून पत्ता कट होणार? जाणून घ्या कारण

IND vs AFG: मोहम्मद सिराजचा टीम इंडियातून पत्ता कट होणार? जाणून घ्या कारण
IND vs AFG: मोहम्मद सिराजचा टीम इंडियातून पत्ता कट होणार? जाणून घ्या कारण


टीम इंडियाने अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी सरावाला सुरुवात केली आहे. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून मुल्लानपूरमध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला कसोटी सामन्यात खेळता येणार की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सिराजला दुखापतीमुळे या कसोटी सामन्याला मुकावं लागू शकतं. सिराजला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मात्र त्यानंतरही सिराज टीमसाठी बॉलिंग टाकत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सिराजच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे सिराजला बॉल टाकताना त्रास जाणवत होता. त्यामुळे सिराज अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यात खेळणार की नाही? याबाबत काहीच निश्चित नाही.

आता सिराज कसोटी सामन्यात खेळताना दिसणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. सिराजची कसोटी सामन्याआधी 1 टेस्ट होईल. सिराज या चाचणीत फिट असल्याचं सिद्ध झालं तरच त्याला अफगाणिस्तान विरुद्ध खेळता येईल. आता सिराजला खेळता आलं नाही तर त्याच्या जागी गुरनुर ब्रार या संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरनुरला संधी मिळाल्यास त्याचं कसोटी पदार्पण होईल. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कोण आहे गुरनूर ब्रार?

गुरनुर ब्रार याला फर्स्ट क्लास क्रिकेटचा ठिकठाक अनुभव आहे. गुरनूरने पंजाबचं 18 कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केलं आहे. गुरनुरने या दरम्यान पंजाबसाठी 52 विकेट्स मिळवल्या आहेत. गुरनूरने एकदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहेत. तसेच गुरनुरने 3 वेळा 4 विकेट्स मिळवल्या आहेत.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यांचं वेळापत्रक

एकमेव कसोटी सामना, 6 ते 10 जून, मुल्लानपूर.

पहिला एकदिवसीय सामना, 13 जून, धर्मशाला.

दुसरा सामना, 17 जून, लखनौ.

तिसरा सामना, 20 जून, चेन्नई.

…तर सिराजच्या जागी आकीब नबीचा समावेश

दरम्यान सिराजला एकमेव कसोटी सामन्यातून बाहेर व्हावं लागल्यास त्याच्या जागी मुख्य संघात आकीब नबी याचा समावेश केला जाऊ शकतो. आकीब देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू-काश्मीरचं प्रतिनिधित्व करतो. आकीबने जम्मू-काश्मीरसाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या गेल्या हंगामात एकूण 60 विकेट्स मिळवल्या होत्या. आकीबचा अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *