Headlines

Nashik | गिरीश महाजनांच्या मिशनला यश! एक भाऊ माघारीच्या तयारीत, दुसरा संपर्काबाहेर; नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट

Nashik | गिरीश महाजनांच्या मिशनला यश! एक भाऊ माघारीच्या तयारीत, दुसरा संपर्काबाहेर; नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट
Nashik | गिरीश महाजनांच्या मिशनला यश! एक भाऊ माघारीच्या तयारीत, दुसरा संपर्काबाहेर; नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट


नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील बंडखोरीच्या चर्चांमध्ये आता मोठी घडामोड समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर गणेश गीते निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्यासोबत विविध स्तरांवर चर्चा झाल्याचे गणेश गीते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या चर्चेनंतर पक्ष नेतृत्वाकडून मिळालेल्या सूचनांनुसार आपण निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर घरी जाऊन कुटुंबीयांशी चर्चा करण्यास सांगण्यात आले. पक्षाकडून आदेश आल्यानंतर मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे गणेश गीते यांनी सांगितले. दरम्यान, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले गोकुळ गीते सध्या संपर्काबाहेर असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता गणेश गीते म्हणाले, “गोकुळ गीते माझ्याही संपर्कात नाहीत. मी नाशिकला पोहोचल्यानंतर घरच्यांकडून त्यांची माहिती घेईन आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन.”

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील बंडखोरीचे संकट कमी करण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असून, गणेश गीते यांच्या संभाव्य माघारीमुळे राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र गोकुळ गीते यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *