
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख त्याच्या चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहे. हिंदीसह मराठी इंडस्ट्रीत रितेश देशमुख याने धमाका केला. राजा शिवाजी या चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. रितेश देशमुख बिग बॉस मराठीला होस्ट करताना दिसला. रितेश देशमुख अभिनेता असला तरीही त्याची मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. रितेश देशमुख याचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री होते. काँग्रेसचे मोठे नेते होते. विलासराव देशमुखांमुळे राज्यात काँग्रेसची मोठी ताकद होती. मराठवाडा आणि विशेष: लातूर जिल्ह्यात त्यांचे मोठे राजकीय वलय बघायला मिळाले. रितेश देशमुख याचे सख्ये दोन भाऊही राजकारणात आहेत. बऱ्याचदा भावांचा प्रचार करण्याकरिता निवडणुकीच्या मैदानात स्वत: रितेश देशमुख उतरतो. लोकांमध्ये रितेश देशमुख याची मोठी क्रेझ आहे. रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार का? हा प्रश्न सातत्याने विचारला जातो.
हेच नाही तर अलीकडच्याच काळात तामिळनाडू विधानसभेवेळी अभिनेता थलपती विजय याने काही दिवसांपूर्वीच आपल्या पक्षाची स्थापन केली आणि निवडणूक लढवली. अभिनेत्याला इतके मोठे यश मिळाले की, तो थेट मुख्यमंत्री झाला. अगदी साध्या लोकांना त्याने तिकिट दिले आणि ते निवडून आले. रितेश देशमुख झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव कार्यक्रमात पोहोचला होता. यावेळी रितेश देशमुख याला त्याच्या राजकीय प्रवासाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
थलपती विजय आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. तिथे कलाकार राजकारणात जातात. आपल्याकडे तसे होत नाही. तामिळनाडूचे पाहून तुम्हाला कधी वाटले का? कलाकार आहात, प्रसिद्ध आहात, आपणही कधी असा काही प्रयत्न करावा का? कारण राजकीय पार्श्वभूमी तर आहेच ना. या प्रश्नावर उत्तर देताना रितेश देशमुख याने एकदम जबरदस्त उत्तर दिले.
रितेश देशमुख म्हटले की, जेवढी समज विजय यांना त्यांच्या प्रसिद्धीची आहे, तेवढीच मला देखील आहे. त्यामुळे मी असा काही प्रयोग करणार नाही. यावर अभिनेत्याला विचारण्यात आले की, असं का पण? तुम्हाला काय राजकारणाचा कंटाळा आला का? यावर रितेशने म्हटले की, मी जर राजकारणात आलो ना तर तुम्हीच बोलणार की, एकाच घरातले किती लोक राजकारणात आहेत. आता रितेश देशमुख याच्या याच विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.