Headlines

मोठी बातमी! डीमिलिटेशन अन् महिला विधेयक संसदेत पारीत होणार? महायुतीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा

मोठी बातमी! डीमिलिटेशन अन् महिला विधेयक संसदेत पारीत होणार? महायुतीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! डीमिलिटेशन अन् महिला विधेयक संसदेत पारीत होणार? महायुतीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे. येणाऱ्या काळात डीमिलिटेशन होऊ शकतं. महिला आरक्षण विधेयक  पारीत होऊ शकतं. डीलिमिटेशन करून हे विधेयक मंजूर करायला आणलं पाहिजे. लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचं बहुमत आहे. पण दोन तृतियांश खासदार हवेत. त्यामुळे बिल पास झालं नाही. पण बदलत्या परिस्थितीत बिल येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं प्रफुल पटेले यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले प्रफुल पटेल? 

येणाऱ्या काळात डीमिलिटेशन होऊ शकतं. महिला आरक्षण विधेयक पारीत होऊ शकतं. डीलिमिटेशन करून हे विधेयक मंजूर करायला आणलं पाहिजे. लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचं बहुमत आहे. पण दोन तृतियांश खासदार हवेत. त्यामुळे बिल पास झालं नाही. पण बदलत्या परिस्थितीत बिल येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं यावेळी प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. दरम्यान प्रफुल पटेल यांच्या या दाव्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी एसआयआरवर देखील जोर दिला आहे.  एसआयआरचं महत्त्व अधिक आहे. ज्या ज्या पक्षांनी लक्ष दिलं. त्या त्या पक्षाला विजय मिळाला. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नये. त्यांनी एसआयआरकडे पाहावे. एसआयआरचं महत्त्व केवळ लोकसभा आणि विधानसभे पुरतं नाही. तर ग्रामपंचायतीतही त्याचं महत्त्व आहे. ज्यांना निवडणूक लढायची  आहे. त्यांनी याकडे लक्ष द्या, बुथ लेव्हलला जाऊन नोंदणी करून घ्या. हे काम तुम्हाला करायचं आहे, असंही यावेळी प्रफुल पटले यांनी म्हटलं आहे.

आतापर्यंत ग्रामीण भागात नेहमी लक्ष घालत आलो आहोत. आपण फुले आंबेडकरी विचारावर चालत आलो आहोत. ग्रामीण भागाची ओळख असलेला आपला पक्ष आहे. गावाकडे काय अडचण आहे, शेतकऱ्याची काय अडचण आहे हे आपल्याला माहीत आहे. पण तितकंच झपाट्याने शहरीकरण झालं आहे. आज मुंबईत ३६ आमदार आहे. उद्या ते वाढतीलही. ठाणे पालघरचे २४ आमदार, पुण्याचे २१ आमदार. पुण्यातही काही तालुके वगळता सर्व तालुके शहरी आहेत. आज मुंबईसारखीच नागपूर, पुणे आणि ठाणे ही शहरे झाली आहे. ग्रामीण भागापेक्षा या शहरी भागाचं वजन अधिक असणार आहे. त्यामुळे आपली तयारी किती आहे याचा विचार केला पाहिजे. सना मलिक वगळता मुंबईत आपल्याकडे एकही आमदार नाही. मागच्या काळात आपल्याकडे चार आमदार होते, सर्वाधिक होते. शहरी भागातही आपल्याला लक्ष केंद्रीत केल्याशिवाय पर्याय नाही. हे महत्त्वाचं आहे, असंही यावेळी प्रफुल पटले यांनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *