Headlines

Chandra Mangal Yog: मेष राशीत चंद्र-मंगळ योग, या 4 राशींचं पालटणार नशीब

Chandra Mangal Yog: मेष राशीत चंद्र-मंगळ योग, या 4 राशींचं पालटणार नशीब
Chandra Mangal Yog: मेष राशीत चंद्र-मंगळ योग, या 4 राशींचं पालटणार नशीब


Chandra-Mangal Yog in Aries 2026: वैदिक ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या युतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा थेट परिणाम थेट व्यक्तींच्या जीवनावर पडतो. पंचांगानुसार, 11 जूनच्या सकाळी 8 वाजून 16 मिनिटांपासून 13 जून सकाळी 9 वाजून 25 मिनिटांपर्यंत मेष राशीत चंद्र आणि मंगळ युती होत आहे. त्याला चंद्र-मंगळ योग म्हणतात. तो अत्यंत शुभ आणि धनलाभ देणारा मानल्या जातो. यामुळे आर्थिक आघाडीवर बळ मिळते. या चार राशींसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

मेष राशी(Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी हा अत्यंत शुभ योग आहे. त्यांच्याच राशीत चंद्र आणि मंगळाची युती होत आहे. त्यांचे कार्य झटपट मार्गी लागतील. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. केलेल्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. नोकरदार वर्गाला पदोन्नती अथवा नवीन जबाबदारी मिळेल. एखादा धार्मिक प्रवासही होऊ शकतो.

मिथुन राशी (Gemini)

मिथुन राशीच्या बँक बॅलेन्समध्ये वाढ होण्याचा हा काळ आहे. तुमच्या कमाईत भर पडेल. अडकलेला पैसा मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारविषयक अडचण दूर होईल. याशिवाय नवीन संधी मिळेल. नवीन कामाची ऑफर मिळेल. घर वा वाहन खरेदीचे योग तयार होत आहे.

सिंह राशी (Leo)

सिंह राशींच्या लोकांना साडेसातीत अनेक दिलासादायक घटना या काळात घडतील. अनेक दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागेल. वडिलांच्या संपत्तीचा लाभ मिळू शकतो. मनासारखी नोकरी मिळू शकते. परदेशात जाण्याचा योग आहे. कुटुंबात एखादे मंगलकार्य होण्याची शक्यता आहे. तर दूरचा प्रवास लाभदायक ठरू शकतो.

धनु राशी (Sagittarius)

धनु राशीसाठी चंद्र आणि मंगळ योग आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा ठरेल. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. धनलाभ होईल. नवीन वाहन खरेदीसाठी चांगला काळ आहे. अचानक धन लाभ होईल. मीडिया वा क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांना विशेष यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. दूरवरून एखादी चांगली वार्ता कानावर येईल.

डिस्क्लेमर: ही ज्योतिष, पंचांग, धार्मिक ग्रंथांवर आधारीत माहिती आहे. माहितीच्या आणि तथ्यांच्या अचूकतेसाठी टीव्ही ९ मराठी जबाबदार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *