
Ladki Bahin Yojana May Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. राज्य सरकारने नुकतेच मार्च आणि एप्रलि महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले आहेत. याच काळात एकीकडे काही महिलांना दोन महिन्यांचे 3000 रुपये मिळालेले आहेत. तर काही महिलांच्या बँक खात्यात फक्त एकाच महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. एकीकडे महिलांना या योजनेचा लाभ दिला जात असताना ई-केवायसी न केल्याने तसेच निकषात न बसल्याने साधारण 80 लाख महिलांचे नाव लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहेत. दरम्यान, आता महिलांना मोठी खबर मिळाली आहे. महिलांना मे महिन्यांचे पैसे कधी मिळणार? याची नेमकी माहिती आता समोर आली आहे.
मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
गेल्या काही दिवसांपासू महिलांना मे महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार? असे विचारले जात होते. जून महिना उजडून 10 दिवस झालेले असूनही अद्याप मे महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. दरम्यान, आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. भाजपाच्या नेत्या तथा आमदार मोनिका राजळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम बँक खात्यावर मे महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार, याची सविस्तर माहिती दिली आहे. मोनिका राजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सरकार लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे 12 ते 15 जूनच्या काळात बँक खात्यात पाठवणार आहे. म्हणजेच लाभार्थी लाडक्या बहिणींना 12 ते 15 जून या काळात लाडक्या बहिणींना मे महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत.
लाडक्या बहिणींचे नाव का हटवण्यात आले?
गेल्या काही महिन्यांत राज्यभरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ई-केवायसीच्या माध्यमातून महिलांच्या पात्रतेची पडताळणी करण्यात आली होती. याच पडताळीमध्ये काही महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, असे समोर आले. सोबतच कागदपत्रांची पूर्तता न करणे, इतर तांत्रिक अडचणी यामुळे साधारण 80 लाख महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेतून काढून टाकण्यात आले.
दरम्यान, लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. या टीकेनंतर आम्ही पुन्हा एकदा ई-केवायसीची विंडो सुरू करायला तयार आहोत, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.