
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला. होर्मुज जवळ अमेरिकेचे हेलिकॉप्टर कोसळल्याने अमेरिकेने थेट इराणवर हल्ले करण्यास सुरूवात केली. ज्याने जगात एकच खळबळ उडाली. संपूर्ण जगाला ज्या घोषणेची प्रतिक्षा होती, अखेर ती घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम शांतता कराराबद्दल मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, या कराराच्या अटींना मंजुरी देण्यात आली असून तेहरानसोबत या आठवड्यातच करार होऊ शकतो. त्यांनी पुढे म्हटले की, या कराराचे ठिकाण आणि वेळ लवकरच जाहीर केली जाईल. म्हणजे अखेर इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे. थेट युद्ध थांबवण्याबद्दल त्यांनी ही घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर जगाने सुटकेचा निश्वास घेतला. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत होती. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे भाष्य केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हटले की, इराणसोबतच्या युद्धात आम्ही एका जबरदस्त करारापर्यंत पोहोचलो आहोत. हा करार स्वाक्षरीकृत होताच स्ट्रेट ऑफ होर्मुझ अधिकृतपणे खुले केले जाईल. विशेष म्हणजे हे सर्व खूप जास्त लवकर घडणार आहे. कदाचित याच आठवड्याच्या अखेरीस. म्हणजेच काय तर याच आठवड्यात इराण आणि अमेरिका युद्ध थांबू शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, या करारादरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, संयुक्त अरब अमिराती, कतार, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत यासारख्या अन्य काही देशांसोबत त्यांनी याबाबत चर्चा केली. त्यांनी अण्वस्त्रेबाबत बोलताना म्हटले की, अण्वस्त्रे असण्याचा प्रश्नही निघाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा पुन्हा म्हटले की, इराणकडे अण्वस्त्रे नसणार आहेत.
इराण अण्वस्त्रे बनवू शकणार नाही. करारातील महत्वाचा मुद्दा तोच होता. ही एक मोठी कामगिरी असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्याला इराण नक्की काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. काल ओमानच्या समुद्रकिनारी थेट भारतीय जहाजावर हल्ला करण्यात आला. ओमानची खाडीमध्ये अमेरिकेला दिसेल त्या जहाजावर हल्ला करताना दिसली.